हसन मुश्रीफ यांच्यासह चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर ईडीची छापेमारी

हसन मुश्रीफ यांच्यासह चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर ईडीची छापेमारी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने पहिली कारवाई केली

पुणे : माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने पहिली कारवाई केली आहे. साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. तर, दुसरीकडे मुश्रीफांचे व्यावसायिक भागिदार चंद्रकांत गायकवाड यांच्या घर व ऑफिसवरही ईडीने छापेमारी केली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यासह चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर ईडीची छापेमारी
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. कारखानातील १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. याचवेळी मुश्रीफांचे व्यावसायिक भागिदार चंद्रकांत गायकवाड यांच्या ऑफिसवरही ईडीने छापा टाकला आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागातील ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट कंपनीच्या कार्यालयावर ईडीचे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

चंद्रकांत गायकवाड ब्रिक्स इंडीया कंपनी सेक्रेटरी आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना ब्रिक्स इंडियाने उभारला होता आणि आप्पासाहेब नलावडे कारखाना देखील हीच कंपनी चालवत होती. कोलकत्तास्थित कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाडचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कार्यालयात अनेक अधिकारी चौकशी करत आहेत.

हसन मुश्रीफ यांच्यासह चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर ईडीची छापेमारी
Vidhan parishad : शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफुस? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु असून कोल्हापूर आणि पुण्यात 2 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 20 अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल आहेत. मुश्रीफांसह शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही माहिती समजताच कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com