eknath shinde | Shivsena
eknath shinde | Shivsena team lokshahi

Shivsena : मंत्री एकनाथ शिंदे 13 आमदारांसह नॉटरिचेबल

शिवसेना फुटण्याची शक्यता?
Published by :
Shubham Tate
Published on

Eknath Shinde : राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने कंबर कसली असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेत (Shiv Sena) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासून म्हणजेच सोमवारपासुन नॉच रिचेबल आहेत. (eknath shinde after vidhan parishad election shiv sena meeting)

एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले आहेत. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं कालच्या विधान परिषद निवडणुकी स्पष्ट झालं आहे.

eknath shinde | Shivsena
Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप कोणाला देणार संधी? या नावांची चर्चा सुरू

याच पाश्र्वभूमीवर रात्री शिवसेनेने वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक रात्री दोन वाजेपर्यंत चालली असल्याचे बोलले जात आहे. तसेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व आमदारांची वर्षावर तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दुसरीकडे आमदारांमध्येही नेतृत्त्वाबाबत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. शिवसेनेकडून वारंवार ही चर्चा फेटाळून लावण्यात येत असतानाच आता मात्र मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com