राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट? पडद्यामागे काय घडतंय? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट? पडद्यामागे काय घडतंय? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून अजित पवार भाजपाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अजित पवारांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. महाराष्ट्रात सत्ताबदलाची चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट? पडद्यामागे काय घडतंय? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले
संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता तरी...; खारघर घटनेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

बीडीडी चाळीचा विषय, कोळी बांधव, असे अनेक विषय घेऊन राज ठाकरे आले होते. मुख्यमंत्री म्हणून ते माझ्याकडे कधीही येऊ शकतात. काही प्रश्न सोडवले आणि काही सुटतील. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. एक काम लगेच फोन वर झालं. पुढे काय होईल तसं कळत नाही, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

राज ठाकरेंना भेटण्यास पूर्वी काही निर्बंध होते. आता मी निर्बंधमुक्त आहे. तसा राज ठाकरे माणूस चांगला आहे, दिलदार आहे, छोट्या मनाचा नाही. त्यांनी व मी बाळासाहेब यांच्यासोबत काम केलं आहे. नेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. मैत्रीमध्ये राजकीय काहीच नाही. राजकारणच्या पलीकडे देखील आपण संबंध ठेऊ शकतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीत बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांशी सिडकोसंदर्भातही बोलणं झालं. 22 लाखाचे घर 35 लाखाला केले आहे, ते परत 22 लाखाला कसे करता येईल, यावरही चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com