'अजित पवारांच्या पायगुणानेच जळगावातील पाच आमदार आमच्या पाठीशी'

'अजित पवारांच्या पायगुणानेच जळगावातील पाच आमदार आमच्या पाठीशी'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अजित पवारांना टोला
Published on

जळगाव : अजित पवारांच्या पायगुणाने जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार आमच्या पाठीशी उभे राहिल्याचे सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. मुक्ताईनगर येथील सभेत एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते मंगळवारी जळगाव दौऱ्यावर होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानंतर त्यांच्या पायगुणाने जिल्ह्यातील पाच आमदार आमच्या पाठीशी उभे राहीले. अजित दादा तुम्ही असेच येत रहा आणि दौरे करत रहा आणि आमचा पाठिंबा वाढवत राहील, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

तर, पाच आमदारांपैकी एकही आमदार निवडून येणार नाही, असे अजित पवार म्हणाले. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीने चित्र स्पष्ट केले असून ग्रामपंचायतीने शिवसेना-भाजप युती जोरात पुढे पाठवत एक नंबरचा पक्ष केला असल्याचेही यावेळी शिंदेंनी म्हंटले आहे. तर ग्रामपंचायत इलेक्शन तो झांकी है, महापालिका जिल्हा परिषद अभी बाकी है, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन चालणाऱ्या शिवसेनेत आहोत, भाजप आमच्या युतीवर नेहमी टीका केली जाते. मात्र, भाजप बाळासाहेबांचे विचाराप्रमाणे काम करते त्यात टीका करण्याचे कारण नाही. आम्ही काय सर्व आमदारांना जबरदस्ती नेलं नाही. एवढ्या ५० आमदारांना जबरदस्ती घेऊन जाणं शक्य नाही. तुम्ही केलेल्या अभद्र युतीच्या विरोधात आम्ही सर्वांनी मिळून हा उठाव केला होता, अशी जोरदार टीका त्यांनी महाविकास आघाडीवर व उध्दव ठाकरेंवर केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com