'माझ्यातले गुण वर येऊच दिले नाहीत, मग मी मास्टरस्ट्रोक मारला'

'माझ्यातले गुण वर येऊच दिले नाहीत, मग मी मास्टरस्ट्रोक मारला'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : शिंदे सरकाराच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. माझ्यातले गुण तुम्ही येऊच दिले नाहीत. मग मी मास्टर स्ट्रोक मारला, असे त्यांनी म्हंटले आहे. महाविकास आघाडी सरकारची बांधली होती मूठ, मुख्यमंत्री बसले घरी आपण चालवत होतो बोट, अशी चारोळीतून टीका शिंदे यांनी केली आहे.

काही लोकं म्हणाले होते 25 वर्ष टिकू. पण, काही लोकं आत जातात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना लगावला आहे. आम्ही अडीच वर्ष इतकी चांगली कामं करू की पुढची 5 वर्ष आम्ही सतेत राहू. देवेंद्र फडणवीस हे बोले पुन्हा येईन ते मला घेऊन आले. देवेंद्र फडणवीस हे एकटे मुख्यमंत्री होते तेव्हा ते एकटे पुरून उरायचे. आता आम्ही दोघं आहोत, एकसे भले दो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी वाभाडे काढलेले आहेत तुम्ही पाठच्या रांगेत होतात याचा देखील उल्लेख करण्यात आला. हजारो कोटी रुपये आपल्याला तिथून देऊ केले आहेत. रांग महत्वाची नाही काम महत्वाच आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले,

तुम्ही नेहमी बोलता मी दिल्लीला जातो. तुम्ही पण जाता ना दिल्लीला. पंतप्रधान यांनी देशाचा डंका जगभर पसरवला आहे. इंदिरा गांधी यांचा मी फॅन होतो. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी आपल्या देशात आणलं. ही महासत्ता आपल्या देशात आहे त्यात तुम्हाला त्रास आहे का? पैशांची कमी होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे, असे त्यांनी सांगितले.

तीन वेळा आम्ही तिथे गेलो. ओबीसी विषयांवर आम्ही बैठक केल्या त्यामुळे इथे निर्णय लागला ना. 370 कलम त्यांनी हटवलं, राममंदिर त्यांनी बांधलं. राज्य सरकारच्या हिताचं जे आहे ते केलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले आहे.

विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंच्या सभेच्या गर्दीचे बॅनर विरोधकांकडून झळकवण्यात आले. यावर बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही जर चुकीचं काम केलं असतं तर मग रस्त्यांवर लोकं थांबले असते का? माझे व्हिडिओ दाखवू का किती गर्दी होती ते? आम्हाला भाडोत्री फौजफाट्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नारायण राणे यांना तुम्ही जेल मधले टाकलं, जेऊन पण दिलं नाही. का तर मुख्यमंत्री यांच्या विरोधात अपशब्द वापरले. बहुमत सिद्ध करून आम्ही बसलो आहोत. कायद्याच्या विरोधात आम्ही कुठेही वागलेलो नाहीत. मी एकचं सांगेन की वैचारिक पातळी घसरलेली आहे, अशीही टीका त्यांनी विरोधकांवर केली.

आज माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून झाला. राज्याच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे. गरिबांचे अश्रू पुसण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. असंगाची संग करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री बरा. आम्ही आमच्या कामाने उत्तर देणारं आहोत. पुढची 12-13 वर्ष व्हिजन डॉक्युमेंट आपण करणार आहोत, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिले आहे.

माझ्यातले गुण तुम्ही येऊच दिले नाहीत. मग मी मास्टर स्ट्रोक मारला. दादा आणि माझ्यात चर्चा व्हायची पण मी ते इथे नाही सांगू शकत नाही, असे गुपितही त्यांनी सांगितले. ती चर्चा काय असेल, यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

सत्तेत असतो तेव्हा मस्ती येता कामा नये आणि पाय जमिनीवर असले पाहिजे. दोन महिन्यामध्ये आम्ही इतकं काम केलं की आताच लोकं घाबरली. अडीच वर्ष राहिलो तर सगळं साफ होईल, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com