सुप्रीम कोर्टाच्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना कालबाह्य केले

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना कालबाह्य केले

राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

मुंबई : राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना कालबाह्य केले असल्याची टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे. तर, माजी मुख्यमंत्र्यांनी भीतीपोटी राजीनामा दिल्याचा टोलाही शिंदेंनी लगावला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना कालबाह्य केले
Maharashtra Political Crisis : उध्दव ठाकरेंनी खुर्चीसाठी नैतिकता सोडली; फडणवीसांचा निशाणा

आजचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित निकाल लागला. अखेर सत्याचा विजय झाला. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. देशात कायदा, संविधान व नियम आहेत. त्याच्या बाहेर कुणाला जाता येत नाही. सरकार स्थापन कायदेशीर बाबींची प्रतिपूर्ती करून केले. सर्वोच्च न्यायालयाने आज त्यावर शिक्कामोर्तब केले. घटनाबाह्य सरकार म्हणून काही लोक स्वतःची पाठ थोपटून घेत होते. त्यांना आज सर्वाच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना कालबाह्य केले आहे, असा निशाणा एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

अपात्रतेचा अधिकार हा अध्यक्षांकडे येईल असे बोलत होतो व तसेच झाले. उद्धव ठाकरे आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्यावर आहेत. आता ते कुणाला व्हीप बजावू शकतात? शिवसेना म्हणून ते व्हीप बजावू शकतात का? शिवसेना आम्ही आहोत. आम्ही पक्ष आहोत असं म्हणणाऱ्यांकडे माणसं किती? व्हीप लागू करायला तुमच्याकडे माणसं किती आहेत? हाही एक प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवले होते. तो निवडणूक आयोगाने आम्हाला आला आहे. निवडणूक आयोगाने घेतलाला निर्णय चुकीचा असल्याचे माजी मुख्यमंत्री व त्यांच्या टीमने म्हंटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले असून अधिकार निवडणूक आयोगाकडे दिला. आयोगाने धनुष्यबाण व पक्ष आम्हाला दिला, असेही त्यांनी म्हंटले आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला. त्यांना माहिती होते की त्यांच्याकडे बहुमत नाही. राज्यात सरकार अल्पमतात आहे हे राज्यपाल नव्हे तर सर्वांनाच माहिती होते. सरकार अल्पमतात आले म्हणून आम्ही सरकार स्थापन केले ते कायदेशीर बाजूने आहे. राजीनामा देण्याशिवाय उध्दव ठाकरेंकडे दुसरा पर्याय नव्हता. लोकांनी शिवसेना व भाजप युतीला कौल दिला होता. आम्ही लोकांना हवे ते केले आहे. म्हणून नैतिकता कुणी जपली ते सांगायची गरज नाही, अशीही टीका एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर सोडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com