हिंमत असेल तर...; शिंदेंचे उध्दव ठाकरेंना आव्हान, सत्तेसाठी निष्ठा विकली
मुंबई : तमिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले आहे. हिंमत असेल तर यांनी मनीशंकर अय्यर यांच्यासारखी गत स्टॅलिन यांची करावी, असे आव्हानच एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना दिले आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी त्यांनी निष्ठा विकली, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.
स्टॅलिन हिंदू विरोधी आहेत. सनातन धर्म पौराणिक आहे त्याला इतिहास आहे. इंडिया आघाडीवाले एकत्र आले. हिंदूंविरोधात हिंदू धर्मविरोधात आता त्यांचे चेहरे उघडे पडले आहेत. आज बाळासाहेब असते तर मनीशंकर अय्यर सारखी त्यांची हालत केली असती. मात्र, त्यांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री गप्प बसले आहेत. हेच त्यांचे हिंदुत्व.
हिंदुत्वाचा मुखवटा पांघरून हिंदुत्ववादी होता येत नाही. हिंमत असेल तर यांनी मनीशंकर अय्यर यांच्यासारखी गत स्टॅलिन यांची करावी, असे आव्हानच एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना दिले आहे. त्यांची निष्ठा सगळ्यांनी पाहिली. सत्तेसाठी, खुर्चीसाठी त्यांनी निष्ठा विकली, बाळासाहेबांचे विचार विकले. त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार एकदम गंभीर आहे. आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिले. ते आरक्षण महाविकास आघाडी असताना हायकोर्टाने नाकारले. यांचा नाकर्तेपणा जो आहे. परंतु, हे सरकार मराठा आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे. कोर्टाने ज्या त्रुटी सांगितल्या आहेत त्यावर काम करून मराठा समाज सामाजिक मागास आहे हे दाखवण्याचे काम सरकार करेल आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे यावर सरकारचे काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गोविंदाचे थर जसे होतं आहेत. तसेच राज्य सरकार विकासाचे थर लावत आहे हे गोविंदांच्या विकासाचे थर आहेत. अहंकाराचे थर कोसळले आता विकासाचे आणि प्रगतीचे थर रचत आहेत. मोदींचा विरोधामध्ये देशात राज्यात जे काही इंडिया आघाडीमध्ये एकत्र येत आहेत. 2024 मध्ये लोकसभेच्या हंडी नरेंद्र मोदी सोडतील अशा प्रकारचा विश्वास सर्व देशवासियांना आहे, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.