'कुटुंबापुरता विचार आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे'

'कुटुंबापुरता विचार आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे'

उध्दव ठाकरेंच्या 'त्या' विधानावर एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

मुंबई : जोडे पुसण्याच्या लायकीची लोकं सत्तेवर बसले आहेत, अशी टीका उध्दव ठाकरेंनी आज शिंदे गटावर केली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असून भाजप-शिंदे गटाने उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उध्दव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे, अशी टीका त्यांनी केली आहे.

'कुटुंबापुरता विचार आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे'
या भेटीत देशविरोधी षडयंत्र रचलं होतं का? नितेश राणेंची राऊत-मलिक भेटीवर टीकास्त्र

काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

जोडे पुसणारे गरीब असतील. पण, ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे, अशी टीका त्यांनी केली आहे.

केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

महाराष्ट्रात येणारी जोडे बनवणारी कंपनी तामिळनाडूला गेली. आणि हे जोडे पुसत बसले आहेत. जोडे पुसण्याच्या लायकीची लोकं सत्तेवर बसले आहेत, अशी टीका उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. कामगार सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com