सत्तातंराची लढाई सोप्पी नव्हती : मुख्यमंत्री शिंदे

सत्तातंराची लढाई सोप्पी नव्हती : मुख्यमंत्री शिंदे

पैठण नगरीत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऐतिहासिक सभा

कसं काय पाटील बरं आहे का काल दिल्लीत झालं ते खरं आहे का; मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटलांना टोला

कसं काय पाटील बरं आहे का काल दिल्लीत झालं ते खरं आहे. दिल्लीत नाराजी नाट्य घडले. जयंत पाटलांना विरोध पक्षनेते व्हायचे होते. परंतु, होता आले नाही. म्हणून राज्यात थांबवू शकले नाही. म्हणून दिल्लीत बोलू दिले आहे.

काहीच्या आजूबाजूला माणसे फिरकत नाही; कॅमेरावरुन मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

जनतेला प्रत्येकाला वाटतोय मी मुख्यमंत्री झालो आहे. आपल्यातला माणूस वाटतो तेव्हाच माणूस फोटो काढयाला येतात. काहीच्या आजूबाजूला माणसे फिरकत नाही. काही म्हणतात राज्याला दोन मुख्यमंत्री पाहिजे. एक फोटो काढायला. कॅमेरासोबत नेता येईल अशाच ठिकाणी जातो.

एकदा शब्द दिला तर मी स्वतःचेही ऐकत नाही; मुख्यमंत्र्यांची डायलॉगबाजी

बाळासाहेबांची खरी सेना कुठली याचे उत्तर या विराट सभेने दिलेले आहे. ही पैसे देऊन जबरदस्ती जमवलेली गर्दी नाही. सर्व प्रेमाने आली आहेत. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला पसंती देणारी ही गर्दी आहे.

बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी शब्द पाळण्यास शिकवले आहे. एकदा शब्द दिला तर तो पाळतो. आणि शब्द दिला तर मी स्वतःचेही ऐकत नाही. भुमरेसाहेब धाडसी माणूस आहेत. दिलेला शब्द पाळला. सर्व शासन, यंत्रणा एकीकडे तरी हे माझ्यासोबत असलेले 50 लोक सर्व जणांना पुरुन उरले. सत्तातंराची लढाई सोप्पे नव्हते.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही उठाव केला : भुमरे

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही उठाव केला. आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्री व्हावे लागेल. असे म्हणून शिंदेंना तयार केले. आम्ही आमदार, खासदार फुटलेले पाहिले. विरोधी पक्षातले सत्तेत जाताना पाहिले. पण सत्ताच शिंदें यांच्यासोबत गेले. हे पहिल्यांदाच घडले. कारण शिंदे बोलतात ते करतात. म्हणूनच त्यांची नोंद जगाने घेतली आहे.

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली म्हणूनच टीका

आज शिंदे यांच्या स्वागतसाठी दुतर्फा गर्दी होती. हे लोक तुमच्या प्रेमापोटी आले होते. आपल्यावर चर्चा झाली. हा भुमरेंना पैसे द्यायची गरज नाही. माझ्यासोबत नेहमीच माणसे असतात. मला पैसे देऊन माणसे आणायची गरज नाही. यांची सवय आहे. हेच पैसे देऊन माणसे आणत आहे. अंगणवाडीतील महिलाना बोलवले असा आरोप केला. ते पत्र 10 फेब्रववारीचे आङे. त्यांत वेळ ही 10 वाजताची आहे. आणि आपल्या सभेचा वेळ 2 वाजताची आहा. यांनीच माणसे उभी केली आणि सांगितले भुमरेंनी 200-300 दिले. तुम्ही कितीही अफवा पसरवल्या तरी तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, अशी टीका संदीपान भुमरे केली आहे.

एकनाथ शिंदेंचे कौतुक करताना शहाजीबापू पाटील भावूक

मला ठाण्यात फोन आला. आरोग्य शिबिराचे उदघाटन करायचे आहे. शिबिर कसले तर, चिमुकल्यांच्या हदयांना होल असते ते बुजवण्याची शस्त्रक्रिया या शिबिरातून होणार आहे. याचे उदघाटन करायचे आहे. एवढा मोठा मुख्यमंत्री आपल्या आई-बहिणींची काळजी करतो. हे खूप मोठे आहे. शिंदे यांच्या पाठिमागे जनता ठामपणे उभे आहे, हे बोलताना शहाजीबापू पाटील भावूक झाले.

शहाजीबापू पाटील यांचा संदीपान भुमरे यांची चूक दाखवत खैरेंना टोला

येथे सर्व मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्री आले आहेत. संदीपान भुमरे यांनी तुम्ही एवढा मोठा स्टेज बाधला पण अकच चुकच केली दोन खुर्च्या कोपऱ्यात ठेवायला पाहिजे होत्या. एक त्या चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासाठी. तेव्हा त्यांना कळले असते. की जनसागर काय आहे. तुमच्या आयुष्यात खासदारकी कधीच नाही, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

ऐतिहासिक पैठण नगरीत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऐतिहासिक सभा होत आहेत. रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी या सभेसाठी जबरदस्त नियोजन केले असून या सभेत संत ज्ञानेश्वर उद्यानाबात त्याच बरोबर तालुक्यातील विकासाबाबत मोठी घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

Lokshahi
www.lokshahi.com