संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता तरी...; खारघर घटनेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता तरी...; खारघर घटनेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 15 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावर लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता तरी...; खारघर घटनेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
बाळासाहेबांचे विचार त्यांनी पायदळी तुडवलीत; एकनाथ शिंदेंचे उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र

ही दुःखद घटना घडलेली आहे. समाजसेवेला वाहून गेलेलं हे कुटुंब आहे. निसर्गाच्या समोर कोणाचं चालत नाही. एक सदस्यीय कमिटी आम्ही गठीत केली आहे. ज्या पद्धतीने त्याचं राजकारण होत आहे ते वाईट आहे. श्री सदस्य यांना घेऊन काय राजकारण आम्ही करणार आहोत? आपुलकी, श्रद्धा, भक्ती, यावर काय बोलणार? संध्याकाळी जरी कार्यक्रम घेतला असता तरी देखील सकाळ पासून लोकं जमली असती, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, खारघर घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उष्माघातामुळे हा प्रश्न निर्माण झाला. यामधून आपल्याला काही शिकायला मिळाले. पुढील काळात नियोजन करताना ध्यानात ठेवावी लागेल. ही घटना दुर्दैवाने घडली. काही लोकांना प्रेतावर राजकारण करण्याची सवय आहे ती बंद झाली पाहिजे, अशी जोरदार टीकाही फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com