eknath shinde
eknath shinde Team Lokshahi

भाजप-शिवसेना युतीच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होता आहेत - मुख्यमंत्री शिंदे

हे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत

राज्यात यंदा दोन वर्षानंतर मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन होत. यंदा निर्बंध मुक्त झालेला असला तरी यात आगामी पालिकेच्या निवडणुकीचा रंग दिसत आहे. राजकीय लोकांच्या गणेश उत्सवाला लावलेल्या हजेरीवरून स्पष्ट होत आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेश विसर्जनात सहभाग घेऊन प्रतिक्रिया दिली आहे.

eknath shinde
भारत जोडो यात्रेवर भाजपची टीका, राहुल गांधींच्या शर्टची सांगितली किंमत; काँग्रेसनेही दिले प्रत्युत्तर

गणेश विसर्जनात बोलत असताना त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वकाही कोंदट वातावरण झाले होते. आता कसे मोकळे वातावरण झाले असून होत असलेला बदल सर्वसामान्य जनतेनेही स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सत्ता स्थापन झाल्यापासून 24 तास जनतेच्या सेवेचे वृत घेतल्याने निवडणुकांसाठी वेगळ्या अशा नियोजनाची गरज नाही. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत.जे काही आहे ते जनतेसमोर आहे. त्यामुळे वेगळ्या अशा नियोजनाची गरज ही शिवसेना-भाजप युतीला नाही तर विरोधकांना असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

Lokshahi
www.lokshahi.com