Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव; एकनाथ शिंदे म्हणाले...

भाजपच्या बालेकिल्ल्यासह महाविकास आघाडीने तीन जागांवर मविआ उमेदवारांनी विजयी पताका झळकवला आहे.

मुंबई : शिक्षक, पदवीधर मतदारसंघाचे निकाल लागले आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यासह महाविकास आघाडीने तीन जागांवर मविआ उमेदवारांनी विजयी पताका झळकवला आहे. तर, कोकणच्या जागेवर भाजपला विजय मिळाला आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबाबत विचार करून सुधारणा केली जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

Eknath Shinde
सत्यजित तांबेंना विजयासाठी कोणी मदत केली? खडसेंनी थेट नावंच सांगितलं

ही विशिष्ट प्रकारची निवडणूक होती. महाविकास आघाडीकडे तीन जागा होत्या आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडे दोन जागा होत्या. कोकणातली जागा आम्ही जिंकली आणि नाशिकची जागा भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मदतीने अपक्षने जिंकली. काही जागा जिंकलो नाही. त्याची कारणमीमांसा केली जाईल आणि त्याबाबत विचार करून सुधारणा केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

जुनी पेन्शन बाबत आमचे शिक्षण मंत्री आणि तो विभाग काम करत आहे त्याबाबत विचार सुरू आहे. सरकार सर्व घटकांना न्याय देणार आहे. आम्ही शिक्षकांना अकराशे कोटीचे अनुदान दिले आहे. त्यांचा विचार केला पाहिजे.

तर, आमच्याकडे 170 आमदार आहे. हे सरकार स्थिर असल्याचे सांगण्याची गरज नाही. पुढच्या निवडणुकीतही हे सरकार येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचे मॅटने म्हटले आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी हे सरकार आहे. सुप्रीम कोर्टाबाबत सरकारने तज्ञ वकिलांची टीम केली आहे, असे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com