आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचे उत्तर; एका महिन्यात...

आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचे उत्तर; एका महिन्यात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात संवाद साधला आहे.

मुंबई : राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवर चर्चा करायला मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी समोर यावे, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी लोकशाहीच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. याला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात दिले आहे. एका महिन्यात कुठलाही मोठ्या उद्योग येतो आणि जातो असे कधी होता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचे उत्तर; एका महिन्यात...
२०२४ची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढणार; फडणवीसांची स्पष्टोक्ती

देवेंद्रजी यांचा मनाचा मोठेपणा आहे. 2019 मध्ये आम्हाला मत मिळाली होती आणि दुर्दैवाने झालं वेगळं. जे लोकांना हवं होत ते सरकार आम्ही त्यांना दिलं. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो. महाराष्ट्रच्या जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत. अर्थसंकल्प पहिला, अर्थसंकल्पाच सगळ्यांना दिलं. जे निर्णय आम्ही घेतले. यामुळे आज महिला भगिनी खुश आहेत. लोकहिताचे निर्णय आम्ही घेतले.

2019 मध्ये येणार सरकार आम्ही आता आणलं. आम्हाला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, मोदीजी यांचा पाठिंबा आम्हाला आहे. राज्याचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही सगळे पैसे घेत आहोत. आता जर केंद्र सरकार मदत करत असेल तर मग का पोट दुःखी झाली पाहिजे. अहंकारामुळे राज्य 10-12 वर्ष मागे गेलं आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी मविआवर केली आहे.

अनेक मोठे उद्योग आपल्याकडे येणार आहेत. जमिनी देण्याच्या प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. त्यांना आरोप करत राहुदेत मी कामाने उत्तर देईन. राज्याच्या हिताचा निर्णय घेत असताना वैयक्तिक विचार करू नये. एका महिन्यात कुठलाही मोठ्या उद्योग येतो आणि जातो असे कधी होता का? तेव्हा मी स्वतः पंतप्रधान मोदींना फोन केला होता. ते म्हणाले, सहकार्य केले नाही, असेही शिंदेंनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com