बाळासाहेबांचे विचार त्यांनी  पायदळी तुडवलीत; एकनाथ शिंदेंचे उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र

बाळासाहेबांचे विचार त्यांनी पायदळी तुडवलीत; एकनाथ शिंदेंचे उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात संवाद साधला आहे.

मुंबई : राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर 50 खोक्यांचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना आता वीट आलेला आहे. या घोषणेला लोकं कंटाळली आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत आहेत त्यांनी पायदळी तुडवलीत, अशी जोरदार टीकाही एकनाथ शिंदेंनी केली आहे.

बाळासाहेबांचे विचार त्यांनी  पायदळी तुडवलीत; एकनाथ शिंदेंचे उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र
आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचे उत्तर; एका महिन्यात...

लोकांना आता वीट आलेला आहे. या घोषणेला लोकं कंटाळली आहेत. इतक्या सगळ्या लोकांना खोके वाटून ते येतात का? जो अनुभव आम्ही घेतले तोही त्यांनी घेतला असेल. बाळासाहेब कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहायचे. यांच्याकडे आता शब्दच नाही आहेत. आम्ही तिकडे लक्षच देत नाही आहोत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काय केलं असतं. त्यांनी जनतेशी त्यांनी प्रतरणा केली. आम्ही त्यांचे विचार पुढे नेत आहेत त्यांनी पायदळी तुडवलीत. आम्ही सत्तेसाठी तडजोड करणार नाहीत, असे टीकास्त्र एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर सोडले आहे.

लोकं सुज्ञ आहेत, कोणी काय करते हे सगळ्यांना माहित आहे. 2019 ला काय ठरलं होत, कोणी कोणाशी बेईमानी केलीय आम्ही जे केलं ते उघडपणे केलं. हजारो लोकं म्हणून तर मला भेटायला येतात. आम्ही देणारे आहोत तर घेणारे नाही आहोत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

सर्वसामान्य लोकांना अपेक्षित निर्णय आम्ही लोकांना देत आहोत. दोन वर्षात आम्ही इतकं काम करू शकलो तर पुढच्या 5 वर्षात आम्ही काय देऊ शकतो हे त्यांना माहित आहे. मी उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन की त्यांचा 5 वर्षांचा अनुभव मदतीस आला. जर कोणाला पोटदुखी असेल तर मग त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे दवाखाने उभारले आहेत, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

आमचे वाढदिवस असे फुलं देऊन साजरे करत नाही, तर हजारो लोकांची मदत करून साजरा होतो. त्यांच्या 50 खोक्यांना 50 कोटींनी आम्ही उत्तर दिलं. माझ्या एका सहिमुळे कोणाचं जीव वाचत असेल तर मी थांबणार नाही. लोकं आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com