Video : पुन्हा एकदा स्टेअरिंग फडणवीसांच्याच हाती, शिंदे बाजूला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोरबंदर प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.

मुंबई : पारबंदर प्रकल्पांतर्गत (MTHL) या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (mainland) प्रत्यक्ष जोडणी झाली. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पारबंदर प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी फडणवीस शिंदेंनी एकाच गाडीत प्रवास केला. गाडीमध्ये फडणवीस ड्रायव्हिंग सीटवर तर एकनाथ शिंदे बाजूला बसले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, याआधीही समृद्धी महामार्गाची पाहणी करताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच गाडीत बसले होते. उपमुख्यमंत्री स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून शेजारी एकनाथ शिंदे बसले होते. यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी राज्याचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती असल्याची टीका विरोधकांनी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com