jogendra kawade eknath shinde
jogendra kawade eknath shindeTeam Lokshahi

मुख्यमंत्री शिंदेची जोगेंद्र कवाडेंच्या गटाबरोबर युती; विरोधकांना क्लीनस्वीप देणार

शिवसेना व वंचितच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कंबर कसली

मुंबई : शिवसेना व वंचितच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कंबर कसली आहे. शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

jogendra kawade eknath shinde
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच; अजित पवार ठाम

एकनाथ शिंदे म्हणाले की, जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने बाळासाहेबांची शिवसेना सोबत युती करण्याचा निर्णय घेतला त्यांचं मी स्वागत करतो. सर्व सामान्यांचे सरकार आहे. आमचे पूर्वीपासून जिव्हाळाचे आहेत. कवाडे यांची एक आक्रमक नेता म्हणून ओळख आहे. प्रस्थापितांना ते हादरवून टाकायचे. सहा महिने जेलमध्ये होते. शोषित, दलित, पीडित समाजाला न्याय देण्यासाठी लाठीकाठ्या खाल्ल्या आहेत. ओबीसीच्या प्रश्नांवरा तिहार जेलमध्येही होते. संघर्षातून आपण इथपर्यंत पोहचलो आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी निर्णय घेणारा पक्ष आहे, असे कौतुक त्यांनी केले आहे.

jogendra kawade eknath shinde
महावितरण कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; देवेंद्र फडणवीसांनी केल्या मोठ्या घोषणा

बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आमच्यासोबत आले आहे. भाजपाने वेळोवेळी भाष्य केलेलं बाळासाहेबांची शिवसेना यांच्या खासदार आणि आमदार निवडून आणण्यासाठी ते मदत करणार आणि आम्ही भाजपासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही लोकसभेत विरोधकांना क्लीनस्वीप करु. विधानसभेत 200 वर जागा येतील, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com