Uddhav Thackeray | Eknath Shinde
Uddhav Thackeray | Eknath ShindeTeam Lokshahi

शिवसेना कुणाची? आयोगाने पुन्हा सुनावणी ढकलली पुढे, आता 'या' दिवशी होणार सामना

युक्तिवाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सोमवारी लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्याचे सांगितले आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर १० तारखेपासूनचीही ही तिसरी सुनावणी आहे. १० तारखेला पहिल्यांदा युक्तिवाद झाला. त्यानंतर १७ तारखेला झाला त्यानंतर आज युक्तिवाद झाला. आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने आपल्या युक्तिवादात ठाकरे गटाचा युक्तिवादाला फेटाळून लावले. दोन्ही गटाचे युक्तिवाद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा निवडणुक आयोगाने सुनावणी पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे.

Uddhav Thackeray | Eknath Shinde
सुनावणी दरम्यान ठाकरे गट अन् शिंदे गटात शाब्दिक चकमक, निवडणूक आयुक्तांनी केली मध्यस्थी

आज तिसऱ्या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. परंतु, यावेळी दोन्ही गटात शाब्दिक वाद झाल्याचे सुद्धा दिसुन. मात्र, आता हा युक्तिवाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सोमवारी लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 30 जानेवारी सुनावणी होणार आहेत तर सोमवारी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे आता या निकालाची उत्कंटा प्रचंड वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com