Shivsena
Shivsena Team Lokshahi

'मिशन लोकसभा' उत्तरप्रदेशमध्ये शिवसेनेच्या 30 जिल्हाध्यक्षांची निवड

बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुखांचे आता पक्ष संघटना वाढवण्यावर भर
Published by :
Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना, शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना कमकुवत होत असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता अडीच महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांना थोपवण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आहे. भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन महाराष्ट्र चालू केले आहे.

आता भाजपला उत्तर म्हणून शिवसेनेने महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही पक्ष मजबूतीकरणावर भर दिला आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशात संघटना मजबूत करण्यासाठी 30 जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची नव्याने घोषणा करण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या

उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये अनिल सिंह यांनी जिल्हाप्रमुखांची घोषणा केली आहे. त्यामध्ये मुझफ्फरनगर, फरुखाबाद, नोएडा, बुलंदशहर, कासगंज, फिरोजाबाद, अमरोहा, बरेली, पिलीभीत, मिर्झापूर, आंबेडकर नगर, लखीमपूर खेरी, मुरादाबाद, मेरठ, गाझियाबाद, सीतापूर, गोंडा, कन्नौज, बहराईच, बस्ती, चंदौली, प्रतापगढ, बाराबंकी, फतेहपूर, कौशांबी, बांदा, चित्रकूट, सोनभद्र, प्रयागराज आणि आग्रा यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com