राजकारण
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक; शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?
आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे.
आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार - अजित पवार एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली होत असते.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जयंत पाटील आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखिल या बैठकीला येऊ शकतात अशी शक्यता आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार आहेत. कार्यकारी मंडळाचे सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार असल्यामुळे तेसुद्धा या बैठकीला हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार बैठकीच्या निमित्ताने शरद पवार - अजित पवार एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.