कॉंग्रेस म्हातारी झाली; आशिष देशमुखांची भाजपात घरवापसी

कॉंग्रेस म्हातारी झाली; आशिष देशमुखांची भाजपात घरवापसी

काँग्रेसमधून निष्कासित माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नागपूर : काँग्रेसमधून निष्कासित माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आशिष देशमुख यांनी कोराडी येथील सभागृहामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. कॉंग्रेस मध्ये गटातटाचे राजकारण आहे. कॉंग्रेस म्हातारी झाली असल्याची जोरदार टीका आशिष देशमुख यांनी केली आहे.

कॉंग्रेस म्हातारी झाली; आशिष देशमुखांची भाजपात घरवापसी
वाघाचे कातड पांघरून लांडगे निघाले गोरेगावला; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

सुबह का भुला अगर शाम को घर आहे तो उसको भुला नही कहते असं म्हणत आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मी घरीच आलो आहे तरी माझं स्वागत केलं. त्यासाठी आभार मानतो. अजित दादांचं देखील स्वागत केलं की ते विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडतात. 2019 ची निवडणूक देवेंद्र फडणवीसांविरोधात मी लढलो होतो. पण आज त्यांचाच नेतृत्वाखाली प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांचा विदर्भाच्या दृष्टीने मुख्यमंत्री असावं योग्य होतं, असे कौतुक देशमुखांनी फडणवीसांचे केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी 2019 ची निवडणूक भाजप-सेना युतीत लढले व त्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर नाही तर तलावर खुपसली. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री विदर्भात दिसले नाही, अशा शब्दात त्यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात अनेक लोक भाजपमध्येच प्रवेश करत आहे. पण, काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडे पाहिलं तर ते भलतीकडे बघतात, असा टोमणाही आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांना लगावला. मला काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी पक्षातून काढलं. मी काय केलं होतं. मी फक्त म्हटलं की राऊत, गांधी यांनी ओबीची माफी मागावी, असं म्हटलं तर मला काढलं. गांधी परिवार ओबीसींच्या विरोधात आहे. या आधी अनेक प्रकरणात राहुल गांधी यांनी माफी मागितली. पण, ओबीसी यांची माफी मागितली नाही. उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला पक्षात काढण्यात आलं, अशीही टीका त्यांनी गांधी परिवारावर केली आहे.

मी आगामी 2024 ची विधानसभेची लोकसभेचे कोणतेही निवडणूक लढणार नाही. मी भाजपसाठी काम करेल, असं आशिष देशमुख यांनी जाहीर केलेलं आहे. पण, कटोलमधील काकागिरी संपवण्यात काम आणि सावनेर मधील दादागिरी संपवण्याच काम मी करेन, असा निर्धार आज आशिष देशमुख यांनी केला. कटोल आणि सावनेर या दोन्ही विधानसभामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी यांना संपवण्याचा निर्धार त्यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com