uddhav thackeray | eknath shinde
uddhav thackeray | eknath shindeTeam Lokshahi

निवडणुक आयोगासमोरील सुनावणी संपल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, याबाबतची निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युतीवाद करण्यात आला.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टने हा निर्णय निवडणूक आयोगाकडे वर्ग केला होता. यावरच आता शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची सुनावणी आजपासून निवडणूक आयोगासमोर सुरू झाली आहे. यावेळी सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ही सुनावणी संपल्यानंतर आता ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

uddhav thackeray | eknath shinde
'ठाकरेंचे पक्षप्रमुख पद बेकायदेशीर' शिंदे गटाच्या जोरदार युक्तिवाद

काय म्हणाले अनिल देसाई?

सुनावणी सव्वा चार वाजेच्या सुमापास सुनावणी सुरु झाली. आमचे वकील कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिंदे गटाने केलेल्या युक्तीवादात आमदार आणि खासदारांचा बहुमत असल्याचं दावा करण्यात आला. पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमत म्हणजे आपला पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण हे लोकशाहीला घातक आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेली ही मंडळी स्वत:च ठरवतात. परंतु, आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पुढच्या वेळी आम्ही संपूर्ण बाजू मांडू. कारण पक्षप्रमुखाने तिकीट दिल्यानंतर ते लोकप्रतिनिधी होतात. मूळ पक्ष महत्त्वाचे आहेत. आम्ही २० लाखाहून जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्रकं दिली आहेत. आमच्या प्रतिनिधींचे प्रतिज्ञापत्रक दिले आहेत. अशी माहिती देसाई यांनी यावेळी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com