Pankaja Munde | Dhananjay Munde
Pankaja Munde | Dhananjay Munde Team Lokshahi

बहिणीची ती माया! राजकीय मतभेद विसरून पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

धनंजय मुंडे यांचा मागील आठवड्यात अपघात झाला होता. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published by :
Sagar Pradhan

राष्ट्रवादी काँग्रेस नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मागील आठवड्यात अपघात झाला होता. या अपघातात मुंडे यांना दुखापत झाली होती. त्यानंतर ते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या अपघातानंतर मुंडे यांना भेटण्यासाठी अनेक नेत्यांनी रुग्णालयात हजेरी लावली होती. दरम्यान, आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. भेटीदरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

Pankaja Munde | Dhananjay Munde
पैसे खाताना धर्म नाही आठवला, सोमय्यांचा मुश्रीफींवर निशाणा

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे नात्याने बहीण-भाऊ आहेत. परंतु, त्या दोघांमध्ये राजकीय संघर्ष होताना कायम दिसतो. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते दोघे कधीही सोबत सोडत नाहीत. बीड, तसेच परळी येथील विकासकामांच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. मात्र हेच राजकीय वैर मागे टाकत पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com