Dhairyasheel Patil
Dhairyasheel PatilTeam Lokshahi

पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपात प्रवेश; फडणवीस म्हणाले, 2014 साली मी प्रयत्न...

अशा कार्यकर्ताचं नेतृत्व आपल्याकडे असले पाहिजे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

पेण मतदारसंघाचे माजी आमदार आणि शेकापा पक्षाचे नेते धैर्यशील पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश झाला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

Dhairyasheel Patil
सत्ताधारी पक्षाला पदवीधरमध्ये स्वत:चा उमेदवार नव्हता अन् पुण्यात...; अजित पवार

मला अतिशय आनंद आहे की आज धैर्यशील पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला. 2014 साली मी प्रयत्न केला होता. पण तेव्हा माझा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यांनी सामान्य माणसाकरता काम केले आहे. विधानसभेत मला धैर्य़शील पाटील यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. विरोधी पक्षात असताना ते आपले प्रश्न धडाडीने मांडायचे. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते माझ्याकडे प्रश्न घेऊन यायचे आणि मी ते सोडवायचो. अशा कार्यकर्ताचं नेतृत्व आपल्याकडे असले पाहिजे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com