राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय; प्रति दिड्यांना मिळणार 'एवढ्या' रुपयांचा निधी

राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय; प्रति दिड्यांना मिळणार 'एवढ्या' रुपयांचा निधी

आगामी विधानसभा निवडणूका पाहता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजेच याच अर्थसंकल्पात राज्य सरकारने प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूका पाहता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजेच याच अर्थसंकल्पात राज्य सरकारने प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, देहूतून आजच तुकाराम महाराजांची पालखी निघाली आहे. उद्या आळंदीतून ज्ञानेश्वरांची पालखी निघणार आहे. महाराष्ट्राची जगभर ओळख दखल घेतलेल्या पंढरीचा युनेस्कोकडे दखल घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती अजित पवारांकडून सभागृहात देण्यात आली. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मोफत औषधं दिली जाणार. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. अजित पवार यांनी केलेल्या घोषणेमुळे वारकरी दिंड्यांना मोठा फायदा होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com