रामदास कदमांसोबत वादानंतर गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला

रामदास कदमांसोबत वादानंतर गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला

गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम हे दोन्ही नेते शिंदेंसोबत सत्तेत दाखल झाले. मात्र, आता शिंदेगटातल्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याने अनेक अंतर्गत गोष्टींच्या चर्चा रंगत आहेत.

मुंबई : गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम हे दोन्ही नेते शिंदेंसोबत सत्तेत दाखल झाले. मात्र, आता शिंदेगटातल्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याने अनेक अंतर्गत गोष्टींच्या चर्चा रंगत आहेत. निष्ठावान कोण?, गद्दार कोण? यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच, गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

रामदास कदमांसोबत वादानंतर गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला
अजित दादा दिल्लीला जाऊन रडले; कोण म्हणालं असं?

गजानन कीर्तीकर यांनी रामदास कदम यांच्यावर गद्दारीचा संशय व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर कीर्तिकरांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होते. यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे रामदास कदमांनी म्हंटले होते. याआधीच गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतील चर्चा अद्याप गुलदस्त्यात असली तरी या भेटीनंतर रामदास कदम आणि किर्तीकर यांच्यातील वाद संपणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काय आहेत आरोप-प्रत्यारोप?

ठाकरेंपासून वेगळे झालेल्या शिवसेना नेत्यांमध्येही आता संघर्ष निर्माण झाला आहे. गजाजन कीर्तीकर यांनी रामदास कदमांवर गद्दारीचा आरोप केला. रामदास कदमांनी काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकरांवर गद्दारीचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपांना कीर्तीकर यांनी एक पत्रक काढून उत्तर दिलं. 1990च्या विधानसभा निवडणुकीत मालाड विधानसभेतून उभं असताना आपल्याला पाडण्यासाठी रामदास कदमांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली होती. शिवाय रामदास कदम त्या काळात इतर पक्षांमध्ये प्रवेश करण्यासाठी सातत्यानं विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संपर्कात होते, असंही कीर्तिकर यांनी म्हटलं होतं. अलिकडच्या काळात राष्ट्रवादीत जाण्यासाठी शरद पवारांच्या संपर्कात होते, असा आरोपही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com