गिरीश बापट यांना सर्वपक्षीयांकडून राजकीय श्रध्दांजली; भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो

गिरीश बापट यांना सर्वपक्षीयांकडून राजकीय श्रध्दांजली; भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यांना राजकीय वर्तुळातून श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यांना राजकीय वर्तुळातून श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटले आहे.

गिरीश बापट यांना सर्वपक्षीयांकडून राजकीय श्रध्दांजली; भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो
'खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले'

चंद्रशेखर बावनकुळे

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. आम्ही आधार गमावला. त्यांना आम्ही भाऊ म्हणून हाक द्यायचो आणि ते मोठ्या भावासारखे धावून यायचे. भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

राधाकृष्ण विखे पाटील

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे लोकाभिमुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. सर्वांशी मैत्री जोपासणे हा त्यांचा गुण होता. मागील अनेक वर्षांचा विधीमंडळातील त्यांचा सहवास सदैव आठवणीत राहाणारा आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

सुप्रिया सुळे

माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे होते.

अजित पवार

राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

जितेंद्र आव्हाड

पुण्याचे खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त वेदनादाई आहे.पुण्याचे सर्वसमावेशक नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. खा.गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

राजेश टोपे

महाराष्ट्राचे माजी मंत्री व लोकसभेचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. गिरीश बापट जी हे एक अत्यंत उत्तम संसदपटू होते. विधानसभेचे सदस्य म्हणून ते अनेकदा निवडून आले. कार्यकर्ता, नगरसेवक आमदार, मंत्री व खासदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे.

धनंजय मुंडे

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून गिरीश भाऊंची ओळख होती. मुंडे कुटुंबाचे आणि भाऊंचे घनिष्ठ संबंध होते. पूर्वी भाजपात असताना अनेकवेळा मला त्यांचे मार्गदर्शन लाभले. स्व. गिरीश भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com