पंकजा मुंडेंच्या विधानाचा अर्थ वेगळा...; 'त्या' विधानावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

पंकजा मुंडेंच्या विधानाचा अर्थ वेगळा...; 'त्या' विधानावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

पंकजा मुंडे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

जळगाव : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मी भाजपची आहे. भाजप माझं थोडीच आहे, या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिला आहे. पंकजा मुंडे यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा घेतला जातोय, असे स्पष्टीकरण महाजनांनी दिले आहे.

पंकजा मुंडेंच्या विधानाचा अर्थ वेगळा...; 'त्या' विधानावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
पुढील २५ वर्ष एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार; उदय सामंतांचा दावा

पंकजा मुंडे या आमच्या नेत्या असून यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा घेतला जात आहे. पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या प्रभारी असून कोअर कमिटीच्या देखील सदस्य आहेत व पूर्णवेळ त्या पक्षाचे काम करत असून त्यांच्या म्हणण्यातून गैर अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचेही गिरीश महाजन म्हणाले आहेत.

तर, राजकारणात हिंमतीने निर्णय घेण्याची गरज असते, असे संजय राऊतांनी मुंडेंच्या वक्तव्यावर म्हंटले होते. यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांच्याकडे जायला कोणाला वेड लागलंय का? असा सवाल उपस्थित केला आहे. तुमच्याकडे जे शिल्लक राहिले त्यांना चार-पाच महिने सांभाळा. उगाच लोकांची थट्टा करू नका, अशी टीकाही त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com