राजकारण
Girish Mahajan : थोडे दिवस थांबा ठाकरेंसोबत कुणीही राहणार नाही
गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, थोडं दिवस थांबा ठाकरेंसोबत कुणीही राहणार नाही. तुमची पालखी उचलायला आता कुणीही राहिलेलं नाही. तुम्ही आमची पालखी उचलायचा विचार करु नका. आमची पालखी उचलणार भरपूरजण आहेत. तुमचं काही आता राहिलेच नाही. सामना पेपर आता काही कामाचा राहिला नाही.
आता संपूर्ण शिंदे गट आमच्यासोबत आहेत. तुमची 90 टक्के शिवसेना आमच्यासोबत आहे. सामना पेपर आता फक्त पुसायच्या कामाचा राहिला आहे. कोण वाचत सामना पेपर? मला कळत नाही आपण सामनाला एवढं महत्वा का देतो? आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आम्हाला. असे गिरीश महाजन म्हणाले.