Raj Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न द्या"

Raj Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न द्या"

भारतरत्न पुरस्कारांची घोषणा होताच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भारतरत्न पुरस्कारांची घोषणा होताच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. यात त्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी राज यांनी केली आहे.

देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषीतज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.

Raj Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न द्या"
Sanjay Raut: मोदी सरकारला बाळासाहेबांचे विस्मरण?

राज ठाकरे म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.

दरम्यान, एकाच वर्षात तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार दिले जातात. यापूर्वी केंद्र सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्यासह पाच जणांची भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर राज ठाकरेंनी बाळासाहेबांना हा बहुमान मिळायला हवा होता, अशी अपेक्षा व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com