सेंद्रिय शेतीकडे पूर्णतः जाणे हा वेडेपणा ठरेल : राजू शेट्टी

सेंद्रिय शेतीकडे पूर्णतः जाणे हा वेडेपणा ठरेल : राजू शेट्टी

सांगलीत अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राजू शेट्टी बोलत होते.

संजय देसाई | सांगली : सेंद्रिय शेतीकडे पूर्णतः जाणे हा वेडेपणा ठरेल, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. असेच सेंद्रिय शेतीच्या नावाखाली प्रचंड बुवाबाजी आणि फसवणूक चालू आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. ते सांगलीत अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांच्या विधानाची आता चर्चा रंगली आहे.

सेंद्रिय शेतीकडे पूर्णतः जाणे हा वेडेपणा ठरेल : राजू शेट्टी
संजय राऊतांचा नातू आला तरी सरकारमध्ये...: अब्दुल सत्तार

सेंद्रिय शेती वाढली तर जगामध्ये अन्नधान्याचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सगळ्या जगानं सेंद्रिय शेती करावी या मताचा मी नाही. कारण देश स्वतंत्र झाला त्यावेळी देश सेंद्रिय शेती करत होता. रासायनिक खते, कीटकनाशके माहित नव्हते. त्यावेळी लोकसंख्या 35- 40 कोटीच्या आसपास असताना बाहेरच्या देशातून भीक मागून या देशातील जनतेला अन्नधान्य खायला आणावे लागत होते. आज 40 कोटीची लोकसंख्या 140 कोटीवर गेली. तेव्हा तरी रासायनिक खतांच्या वापरामुळे पुरेसं अन्नधान्य आज मिळत आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारकडून सेंद्रिय शेतीला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com