राज्यपाल चूकच, पण...: चंद्रशेखर बावनकुळे

राज्यपाल चूकच, पण...: चंद्रशेखर बावनकुळे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत.

नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यपालाविरोधात निदर्शने करण्यात येत असून महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे. तसेच, राज्यपाल पदावरुन कोश्यारींना हटविण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याने विरोधकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सष्टीकरण दिले आहे. राज्यपालांची चूक झाली आहे. परंतु, त्यांना ठेवायचे की नाही हे आमचा अधिकार क्षेत्र नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

राज्यपाल चूकच, पण...: चंद्रशेखर बावनकुळे
उदयनराजे यांचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू : संजय राऊत

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ते खोटं बोलत आहे. वेदांतामध्ये माहिती अधिकारातच समोर आले आहे की मागच्या सरकारने कुठेही वेदांताला जागा दिलेली नाही. त्यासंदर्भात कुठेही बैठक घेतली नाही. त्यामुळे वेदांता परत गेला आहे. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग, कंपन्या कोणाशी बोलले असते. त्या काळात कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता खोटारडेपणाचा कळस करत आहेत, असा पलटवार त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला.

राज्यपाल चूकच, पण...: चंद्रशेखर बावनकुळे
प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले. मात्र, अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाही. पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होत्या. मात्र, खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याकडे कोणाचाही लक्ष नव्हते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. म्हणून विमा कंपन्यांनी त्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर पैसे खाल्ले. हे मागच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांच्या प्रकरणात जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी करा अशी माझी मागणी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

राज्यपाल चूकच, पण...: चंद्रशेखर बावनकुळे
'होय मी श्रद्धाला मारले...', आफताबने पॉलिग्राफी चाचणीत केला गुन्हा कबूल

उदयनराजे असो किंवा आम्ही. आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचे की नाही हे आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. त्यादिवशी राज्यपालांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचे की नाही ठेवायचे हा आमचा अधिकार क्षेत्र नाही, असे स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिले आहे. तर, संजय राऊत नुसते टिवटिव करतात, सामनातून छापून आणतात आणि मग सकाळी मीडियासमोर येतात. आम्ही त्याच त्या बाबींना किती दिवस उत्तर द्यायचं, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राज्यपाल चूकच, पण...: चंद्रशेखर बावनकुळे
...नाहीतर मानेवर वसुलीची ‘सुरी’ फिरवू; शिवसेनेचा शिंदे सरकारवर टीकास्त्र
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com