Gram Panchayat Election Result : परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचे वर्चस्व;  पंकजा मुंडे यांना धक्का

Gram Panchayat Election Result : परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचे वर्चस्व; पंकजा मुंडे यांना धक्का

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे.
Published on

विकास माने, बीड

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 5 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर आज मतमोजणी सुरु झाली.

परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी, डिघोळ अंबा आणि राडी तांडा ग्रामपंचायत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात तर राडी ग्रामपंचायत पंकजा मुंडेच्या ताब्यात आहे.

परळी तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. सोनहीवरा ग्रामपंचायत पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. वानटाकळी तांडा आणि हीवरा या दोन ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com