Gram Panchayat Election 2023 Result | विदर्भात BRSची एन्ट्री, काँग्रेसला धक्का

Gram Panchayat Election 2023 Result | विदर्भात BRSची एन्ट्री, काँग्रेसला धक्का

राज्यात आज सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

Gram Panchayat Election 2023 Result Live : विदर्भात BRSची एन्ट्री, काँग्रेसला धक्का 

विदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्ष म्हणजे बीआरएसने चांगलेच यश मिळवले आहे. या पक्षाने काँग्रेसला धक्का बसला आहे.

Gram Panchayat Election 2023 Result Live : काटेवाडी ग्रामपंचायत पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात

अजित पवार पुरस्कृत जय भवानी माता पॕनलचा विजय.

काटेवाडीत भाजपने उभ केलं होतं अजित पवारांच्या विरोधात पॅनल.

Gram Panchayat Election 2023 Result Live : अकोल्याच्या सर्व जागांचा निकाल समोर

 अकोल्याच्या सर्व जागांचा निकाल समोर

4 जागांवर वंचितचं वर्चस्व तर, काँग्रेसचा 3 जागांवर विजय

Gram Panchayat Election 2023 Result Live :   नाशिक जिल्ह्यातील निवडणूक असणाऱ्या एकूण ग्रामपंचायत ४८ 

भाजप - ४

शिंदे गट - ३

अजित पवार गट - ६

उध्दव ठाकरे गट - ३

काँग्रेस - ३

शरद पवार गट - २

इतर - ३

मनसे - १

Gram Panchayat Election 2023 Result Live : अमळनेर तालुक्यातील 17 पैकी 14 ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा

अमळनेर तालुक्यात मंत्री अनिल पाटील यांचे वर्चस्व कायम

अमळनेर तालुक्यातील 17 पैकी 14 ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा

तर दोन ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर मानावे लागले समाधान

Gram Panchayat Election 2023 Result Live:  ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का

ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का

मतदारसंघातील एकही ग्रामपंचायत शिंदे गटाकडे नाही.

त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायत पैकी १ भाजप तर २ ग्रामविकास आघाडीकडे.

तर वेंगुर्ले तालुक्यात ४ पैकी ३ भाजपकडे तर एक ठाकरे गटाकडे.

दीपक केसरकर यांना हा मोठा धक्का.

Gram Panchayat Election 2023 Result Live:  जळगाव यावल तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व 

यावल तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व

यावल तालुक्यात 11 ग्रामपंचायती पैकी 5 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा तर 3 ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

शरद पवार गट व काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर मानावे लागले समाधान

एका जागेवर अपक्ष विजयी

Gram Panchayat Election 2023 Result Live:  भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा बावडा ग्रामपंचायतीवर विजय

Gram Panchayat Election 2023 Result Live :  जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम

जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम. 18 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा

Gram Panchayat Election 2023 Result Live :  सांगली शिराळा तालुक्यातील एकूण २४ ग्रामपंचायतचे निकाल हाती

शिराळा तालुक्यातील एकूण २४ ग्रामपंचायतचे निकाल हाती

भाजपच्या सत्यजित देशमुख, महाडिक बंधु गटाकडे एकूण 12 ग्रामपंचायतची सत्ता

शरद पवार गटाचे आमदार मानसिंगराव नाईक गटाकडे 11 गामपंचायतीची सत्ता

तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडे 1 ग्रामपंचायतची सत्ता

Gram Panchayat Election 2023 Result Live : मुक्ताईनगर तालुक्यात एकनाथ खडसेंना धक्का

मुक्ताईनगर तालुक्यात एकनाथ खडसेंना धक्का बसला आहे.

Gram Panchayat Election 2023 Result Live :  दौंडमध्ये भाजप आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व

दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व प्रस्थापित केले असून 8 ग्रामपंचायतीवर भाजप आमदार राहुल कुल पुरस्कृत सरपंच विजयी झाले.

Gram Panchayat Election 2023 Result Live :  मंत्री दिलीप वळसे पाटील यांची निरगुडसर गावातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात !

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची निरगुडसर गावातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात ! शिवसेनेचे रविंद्रशेठ वळसे पाटील विक्रमी मतांनी विजयी

Gram Panchayat Election 2023 Result Live: सांगलीत 10 ग्रामपंचायतवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर गटाची सत्ता

आटपाडी तालुक्यातील एकूण 15 ग्रामपंचायतीचे निकाल हाती. 10 ग्रामपंचायतवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर गटाची सत्ता. 5 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर गटाची सत्ता

Gram Panchayat Election 2023 Result Live : कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का

कर्जत - जामखेड मतदार संघाचे संपूर्ण निकाल जाहीर. 9 जागांपैकी

भाजपकडे 5 , शरद पवार गटाकडे 2, अजित पवार गटाकडे 1, स्थानिक आघाडीला 1

कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का. भाजप आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व कायम.

Gram Panchayat Election 2023 Result Live: जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 28 जागांवर शिंदे गटाची सत्ता

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गड राखला

जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 28 जागांवर शिंदे गटाची सत्ता

तर पाळधी या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मूळगावी वर्चस्व कायम

विजय रूपसिंग पाटील पाळधी या गावी गुलाबराव पाटील यांचे समर्थक सरपंचपदी विराजमान

Gram Panchayat Election 2023 Result Live :  अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या गिरासे पॅनलने आपला गट कायम ठेवत मिळवली सत्ता

पाथरगाव ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन होऊन भाजपाने काबीज केली ग्रामपंचायत

दोन्ही ग्रामपंचायती भाजपकडे आल्याने स्थानिक भाजपा आमदार प्रताप अडसड यांचे मतदारसंघात वर्चस्व कायम

काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना धक्का

Gram Panchayat Election 2023 Result Live : रायगड रोहा तालुक्यात अजित पवार गटाचे वर्चस्व

12 पैकी 7 जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सरपंच

Gram Panchayat Election 2023 Result Live : अहमदनगर पाथर्डी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

पाथर्डी ग्रामपंचायतचा संपूर्ण निकाल जाहीर. पाथर्डी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व15 पैकी 11 जागेवर भाजपचे वर्चस्व

शिंदे गट 1

ठाकरे गट 1

शरद पवार गट 1

 तर अपक्ष 1

Gram Panchayat Election 2023 Result Live: बारामती 24 ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे

भोंडवेवाडी

म्हसोबा नगर

पवई माळ

आंबी बुद्रुक

पानसरे वाडी

गाडीखेल

जराडवाडी

करंजे

कुतवळवाडी

दंडवाडी

मगरवाडी

निंबोडी

साबळेवाडी

उंडवडी कप

काळखैरेवाडी

चौधरवाडी

वंजारवाडी

करंजे पूल

धुमाळवाडी

कऱ्हावागज

सायबाचीवाडी

कोराळे खुर्द

शिर्सुफ

मेडद

Gram Panchayat Election 2023 Result Live: सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा करिश्मा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत लागलेल्या निकालात भाजपचे वर्चस्व. पाच पैकी चार ग्रामपंचायतींवर विजय

Gram Panchayat Election 2023 Result Live : वर्धा आर्वी तालुक्यातील सातही ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता

आर्वी तालुक्यातील सातही ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता

मतदान झालेल्या पाचही ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता

काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होती थेट लढत

Gram Panchayat Election 2023 Result Live : रायगड भरत गोगावले यांना धक्का

भरत गोगावले यांना धक्का. महत्वाची नागाव ग्रामपंचायत भाजपकडे, माणगावमध्ये भाजपने खाते उघडले. सरपंचपदी भाजपचे यशवंत कासरेकर विजयी

Beed Gram Panchayat Election Result Live : बीड परळीमध्ये दोन ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडे यांचे वर्चस्व

परळी तालुक्यात तीन ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली यातील दोन ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडे यांनी वर्चस्व राखले आहे तर पंकजा मुंडे यांना एकावरच समाधान मानावे लागले आहे.

Bhiwandi Gram Panchayat Election Result Live : भिवंडी तालुक्यात भाजपची विजयी घौडदौड

भिवंडी तालुक्यात भाजपची विजयी घौडदौड

16 पैकी 8 जागी भाजपचे सरपंच

शिवसेना आणि ठाकरे गटाला प्रत्येकी एक जागा

Gram Panchayat Election Result Live : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची घोडदौड

बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागत असून यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सर्वात जास्त यश येत असल्याचे चित्र दिसत आहे. तर त्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टी दुसऱ्या नंबरवर आहे.

Gram Panchayat Election Result Live : बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी भाजपचा झेंडा

बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपचे दिलीप खैरे यांच्या पॅनलचे सरपंचपदासह 4 ग्रामपंचायत सदस्य आले निवडून. उर्वरित पाच ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी गटाकडे

Gram Panchayat Election Result Live : टेरव ग्रामपंचायत अटीतटीच्या निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांना धक्का

टेरव ग्रामपंचायत अटीतटीच्या निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांना धक्का

अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व

किशोर मनोहर कदम सरपंच म्हणून विजयी

ठाकरे गटाचे उमेदवार झाले पराभूत

Gram Panchayat Election Result Live :  नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील १६ पैकी १६ ग्रामपंचायतचा निकाल

राष्ट्रवादीचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा फटका बसला आहे. १६ ग्रामपंचायत मध्ये सर्वाधिक लक्ष विधी ठरले त्या अपक्ष ग्रामपंचायत निवडून आला आहे. यामुळे अनेक प्रस्थापितांना मोठा फटका बसला आहे.या निवडणुकीत अपक्षाला मोठा यश १६ पैकी ७ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी

Gram Panchayat Election Result Live : अहमदनगर तालुक्याचा संपूर्ण निकाल जाहीर

अहमदनगर तालुक्याचा संपूर्ण निकाल जाहीर

भाजपकडे 4 ग्रामपंचायत

1 जागा उध्दव ठाकरे गट

1 जागा अजित पवार गट

स्थानिक आघाडीकडे 2 ग्रामपंचायत

नगर तालुक्यात उद्धव ठाकरे गटाने उघडले खाते

 Gram Panchayat Election Result Live :  शिराळा तालुक्यातील सावंतवाडी गावात मनसेची सत्ता

शिराळा तालुक्यातील सावंतवाडी गावात मनसेची सत्ता

मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता

शिराळा तालुक्यातील शिरसटवाडी ग्रामपंचायतीत सत्ता बदल

भाजपकडून राष्ट्रवादीकडे सत्ता

सरपंच पदासह सर्व जागांवर विजय

 Gram Panchayat Election Result Live :  शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व

सातारा पाटण 10 पैकी 6 ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व

Baramati Gram Panchayat Election Result Live :  20 ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे

बारामती तालुक्यातील एकूण 20 ग्रामपंचायतीचा निकाल हाती

भोंडवेवाडी

म्हसोबा नगर

पवई माळ

आंबी बुद्रुक

पानसरे वाडी

गाडीखेल

जराडवाडी

करंजे

कुतवळवाडी

दंडवाडी

मगरवाडी

निंबोडी

साबळेवाडी

उंडवडी कप

काळखैरेवाडी

चौधरवाडी

वंजारवाडी

करंजे पूल

धुमाळवाडी

कऱ्हावागज

सायबाचीवाडी

Gram Panchayat Election Result Live   : जळगावात शिंदे गटाची सत्ता

जळगावमध्ये शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांचं वर्चस्व

Nashik Gram Panchayat Election Result Live   : नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक

भाजप - 03

शिंदे गट - 02

अजित पवार गट - 02

उद्धव ठाकरे गट - 03

काँग्रेस - 01

शरद पवार गट - 02

मनसे - 01

इतर - 03

Gram Panchayat Election Result Live   : बारामती तालुक्यातील मतमोजणीच्या तीन फेऱ्या पूर्ण

18 गावांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक हाती सत्ता

Pune Gram Panchayat Election Result Live   : आंबेगावात दिलीप वळसेंना धक्का

आंबेगावात दिलीप वळसेंना धक्का. शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार रवी वळसे पाटील 124 मतांनी आघाडीवर

Gram Panchayat Election Result Live   : जुन्नर तालुक्यातील वेल्हे ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय

जुन्नर तालुक्यातील वेल्हे ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे उमेदवार विजयी

Gram Panchayat Election Result Live   : इंदापूरमधून सहा पैकी तीन ग्रामपंतीचे निकाल हाती

इंदापूर मधून सहा पैकी तीन ग्रामपंतीचे निकाल हाती

वकिलवस्ती ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता

शिंदे वाडी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

लाकडी ग्रामपंचायत मध्ये स्थानिक आघाडी विजयी

Gram Panchayat Election Result Live   : पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार ग्रामपंचायत मतमोजणीत गोंधळ

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार ग्रामपंचायत मतमोजणीत गोंधळ

एका EVM मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने मतमोजणी थांबली

कान्हूरपठार येथे संध्या ठुबे या 75 मतांनी आघाडीवर तर रेश्मा व्यवहारे

301 मतांची मोजणी शिल्लक असताना EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

मशीनमध्ये बिघाड झाल्याने प्रशासनाची उडाली तारांबळ

Sindhudurg Gram Panchayat Election Result Live   : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात शरद पवार गटाचा विजय 

हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई, खामगाव मावळ, कोलवडी ग्रामपंचायतीत शरद पवार गट विजयी.

Sindhudurg Gram Panchayat Election Result Live   : सिंधुदुर्गात वैभव नाईक यांना धक्का

आचरा, कुडाळ वालावलमध्ये भाजपाची सत्ता

Gram Panchayat Election Result Live :  कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का

कर्जत मतदारसंघातील निकाल जाहीर कुंभेफळ आणि खेड गावात भाजपचा सरपंच. कर्जत मतदार संघात राम शिंदे गटाला दोन जागा तर रोहित पवार गटाकडे एक जागा

Gram Panchayat Election Result Live :  कणकवली तालुक्यातील ओटव ग्रामपंचायत भाजपाकडे

नितेश राणेंच्या मतदार संघातील कणकवली तालुक्यातील ओटव ग्रामपंचायत भाजपकडेसरपंचासहित भाजपचे सर्व सदस्य विजयी झाले आहेत.

pune Gram Panchayat Election Result Live : नारायणगावात ठाकरे गटाचा विजय 

खासदार अमोल कोल्हेंच्या नारायण गावात राष्ट्रवादीचा पराभव

Jalgaon Gram Panchayat Election Result Live :  जळगाव तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

लोकनियुक्त सरपंच वैजंता शिरसाट यांच्यासह शिंदे गटाचे 10 सदस्य विजयी झाले आहेत.

Gram Panchayat Election Result Live :  नाशिक जिल्ह्यातील चिराई ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता

नाशिक जिल्ह्यातील चिराई ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता. सरपंचपदी शकुंतला पाटील विजयी.

Gram Panchayat Election Result Live :  सांगलीत ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गटात जोरदार वादावादी

सांगलीत ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गटात जोरदार वादावादी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार. जुना राजवाडा येथील मतमोजणी केंद्राबाहेर घडला प्रकार. काँग्रेस आघाडीच्या पॅनलचा झाला आहे विजय.

ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपा 1 नंबरवर

भाजपाने सर्वाधिक 121 ग्राम पंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.

Gram Panchayat Election Result Live :  नाशिक जिल्ह्यात मनसेने उघडलं खातं

जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा. संगीता कैलास गायकवाड 558 मते मिळाली.

Kolhapur Gram Panchayat Election Result Live : कोल्हापूर ग्रामपंचायत निकाल 

भाजप – 3
शिंदे गट – 6
ठाकरे गट – 1
अजित पवार गट – 14
पवार गट – 0
काँग्रेस – 7
इतर - 14

Gram Panchayat Election Result Live : मुरबाडमध्ये पहिला सरपंच शिंदे गटाचा

मुरबाडचा पहिला निकाल हाती. मालती दीपक हरड विजयी

Amravati Gram Panchayat Election Result Live : अमरावती जिल्ह्यात पहिला निकाल हाती

अमरावती जिल्ह्यात पहिला निकाल हाती

भातकुली तालुक्यातील बैलमारखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी स्थानिक विकास आघाडीचा झेंडा

सरपंचपदी राजू संके विजयी

विजयानंतर गुलाल उधळून व ग्रामगीता देऊन सरपंच व सदस्यांच स्वागत

अमरावतीत 19 ग्रामपंचायतची मतमोजणी सुरूच

Baramati Gram Panchayat Election Result : बारामतीमधील 8 ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचे वर्चस्व

बारामतीमधील 8 ही ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाच वर्चस्व

Gram Panchayat Election Result Live : कराड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीची मतमोजणी संपली

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 8

राष्ट्रीय काँग्रेस - 3

भाजपा - 1

Gram Panchayat Election Result Live : मांडल ग्रामपंचायतीत अजित पवार गट विजयी

मांडल ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री जयकुमार रावल यांचे कार्यालय प्रमुख रामकृष्ण मोरे यांच्या पॅनलचा पराभव. अजित पवार गटाच्या रमाबाई आखाडे विजयी झाले आहेत.

Gram Panchayat Election Result Live : सांगलीत दोन ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता तर, एका ग्रामपंचायतवर शिंदे गटाची सत्ता

सांगलीत दोन ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता तर एका ग्रामपंचायतवर शिंदे गटाची सत्ता आली आहे.

Sindhudurg Kankavali Gram Panchayat Election Result कणकवली तालुक्यातील वारगाव आणि हळवल पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने खाते खोलले आहे. कणकवली तालुक्यातील वारगाव आणि हळवल पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी.

Gram Panchayat Election Results LIVE : अहमदनगरमध्ये मतमोजणीचा पहिला निकाल हाती

गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत काँग्रेस विजयी तर दहेगाव ग्रामपंचायत भाजपाकडे

Gram Panchayat Election Results LIVE : जळगावमध्ये शिंदे गट आणि भाजपाने खाते उघडले

शिंदे गटाच्या अनिता बाळू धाडी लोणवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विजयी झाल्या आहेत. जळगाव तालुक्यातील करंजगाव - धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपा झेंडा फडकला आहे.

Gram Panchayat Election Results LIVE : सांगोला तालुक्यातील सावे ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व

सांगोला तालुक्यातील सावे ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व

शिवसेनेचा पराभव, शेकापचे शिवाजी भैरु वाघमोडे विजयी

Wardha Gram Panchayat Election Results LIVE : वर्धा तालुक्यातील धामणगाव वाठोडा ग्रामपंचायत वर काँग्रेसची एक हाती सत्ता

वर्धा तालुक्यातील धामणगाव वाठोडा ग्रामपंचायतवर काँग्रेसची एक हाती सत्ता

काँग्रेसच्या सरपंच पदाच्या रेश्मा प्रफुल कुचेवार विजयी

संपूर्ण पॅनलचा दणदणीत विजय

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची होती लढत

आमदार रणजीत कांबळे यांच्या गटाला घवघवीत यश

Gram Panchayat Election Results LIVE : अहमदनगर फ्लॅश श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा निकाल हाती

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा निकाल हाती. काँग्रेस गटाचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी, जिल्ह्यातील दोन निकाल हाती, एका जागा काँग्रेसकडे तर एका जागेवर शरद पवार गटाचा विजय. श्रीगोंदा तालुक्यात भाजपला धक्का...

Gram Panchayat Election Results LIVE : बारामती तालुक्यातील पानसरेवाडी ग्रामपंचायतमध्ये अजित पवार गटाचा सरपंच

बारामती तालुक्यातील पाचवी पानसरेवाडी ग्रामपंचायतमध्ये अजित पवार गटाचा सरपंच विजयी झाला आहे.

बारामती तालुक्यातील चौथी आंबी ग्रामपंचायतमध्ये अजित पवार गटाचा सरपंच

बारामती तालुक्यातील चौथी आंबी ग्रामपंचायतमध्ये अजित पवार गटाचा सरपंच विजयी

Gram Panchayat Election Results LIVE : भिवंडी मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी गेटवर धक्काबुक्की. भिवंडी मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी

Gram Panchayat Election Results LIVE : कोल्हापूर ग्रामपांचायत निवडणुकींचा निकाल

अजित पवार गट –14
शरद पवार गट – 0
भाजप – 2
शिंदे गट – 6
उध्दव ठाकरे गट – 1
काँग्रेस – 6
इतर - 7

Gram Panchayat Election Results LIVE :   उनभाट ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ऊबाठा शिवसेना गटाच्या संगीता पाठारे विजयी

Gram Panchayat Election Results LIVE :  कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे

कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे गेली आहे. अजित पवार गटाचे महेश नामदेवराव भोईटे विजयी तर कोदवडे सदस्य सौ मंगल धनाजी पाटील विजयी झाले आहेत.

Pandharpur Gram Panchayat Election result Live : 

माळशिरस तालुक्यातील कोंढारपट्टा व वाफेगाव या दोन ग्रामपंचायती मध्ये मोहिते पाटील गट विजयी झाले आहेत

Buldhana Gram Panchayat Election result : बुलढाण्यात पहिला निकाल हाती

बुलढाण्यातील पहिला निकाल हाती, बुलढाणा तालुक्यातील घाटनंद्रा ग्रामपंचायतीत गणेश भुसारी विजयी

Gram Panchayat Election Results LIVE : लालठाणे ग्रामपंचायत बहुजन विकास आघाडीकडे गेली आहे.

बहुजन विकास आघाडीच्या प्रिया प्रकाश कामडी या लाल ठाणे ग्रामपंचायतीवर सरपंच पदासाठी विजयी

Jalgaon Gram Panchayat Election Results LIVE : जळगाव मध्ये शिंदे गट व भाजपाने खाते उघडले

जळगाव तालुक्यातील लोणवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

शिंदे गटाच्या अनिता बाळू धाडी लोणवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विजयी

जळगाव तालुक्यातील करंजगाव - धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपा झेंडा

करंजगाव धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचे समाधान प्रभाकर सपकाळे सरपंच पदी विराजमान

Gram Panchayat Election Results LIVE Updates: पालघर, 51 सार्वत्रिक ग्रामपंचायत मतमोजणी

49 साठी मत मोजणी

शिवसेना शिंदे गट - ०

उबाठा -०2

भाजप-००

बाविआ-०3

माकप-००

राष्ट्रवादी-००

अपक्ष 02

मतदानावर बहिष्कार टाकलेल्या ग्रामपंचायत 01 (शिलटे) 
निकाल 
एकूण - 05

Gram Panchayat Election Results LIVE Updates: कराडमध्ये शरद पवार गटाच वर्चस्व, सत्ता कायम राखण्यात राष्ट्रीय काँग्रेसला यश 

कराड कांबेरीवाडी ग्रामपंचायत आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेलं आहे. कराड टेंभु ग्रामपंचायत राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील शरद पवार गटाकडे गेली. सत्ता कायम राखण्यात राष्ट्रीय काँग्रेसला यश 

Nandurbar Panchayat Election Results LIVE Updates:  

शहादा तालुक्यातील कर्जत ग्रामपंचायतीवर भाजपाने कमल फुलवलं.

शहादा तालुक्यातील पहिला निकाल जाहीर.

Gram Panchayat Election Results LIVE Updates:  पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील 26 पैकी तीन निकाल हाती

मंगळवेढा तालुक्यातील 26 पैकी तीन निकाल हाती आले आहेत.उचेठाण,बठाण आणि जुनोनी या तीन ग्रामपंचायतीवर भाजपा आमदार समाधान आवताडे यांची सत्ता आली आहे

Sangli Gram Panchayat Election Results LIVE Updates:  सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने खाते खोलले

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपने खाते खोलले. मिरज तालुक्यातील हरिपूर ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता कायम. खासदार संजय काका पाटील गटाचे अरविंद तांबवेकर यांची हरिपूर ग्रामपंचायतवर सत्ता कायम.

Gram Panchayat Election Results LIVE Updates:  कोल्हापूर-शिरोली दुमाला ग्रामपंचायत काँग्रेसकडे

कोल्हापूर-शिरोली दुमाला ग्रामपंचायत काँग्रेसकडे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा पुत्र विजयी

Gram Panchayat Election Results LIVE Updates: सांगोल्यात शहाजीबापू पाटलांना धक्का

सांगोल्याची खवासपूर ग्रामपंचायत शेकापकडे, शेकापचे विजय दीक्षित सरपंच पदी विराजमान

बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील सरपंचपद अजित पवार गटाकडे

बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील सरपंचपद अजित पवार गटाकडे. सरपंचपद 356 मतांनी विजयी. बारामतीमधीूल ती ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचं वर्चस्व.भोंडवेवाडी, पवईमाळ, म्हसोबानगर ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे

Pandharpur Gram Panchayat Election Results : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे ग्रामपंचायतीवर शरद पवार गटाचा झेंडा

विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना धक्का

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या गटाची सत्ता

गुरसाळे ग्रामपंचायतवर 40 वर्षानंतर सत्तांतर 

Kolhapur Gram Panchayat Election Results : आमदार प्रकाश आबिटकर गटाची बारडवाडी ग्रामपंचायततीवर एकहाती सत्ता

लोकनियुक्त सरपंच वसंत पांडुरंग बारड यांच्यासह

10-0 ने ग्रामपंचायत ताब्यात

Gram Panchayat Election Results : भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींना पहिला झटका

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुधनी ग्रामपंचायतीत काँग्रेस पॅनल विजयी. 7-2 ने काँग्रेसच्या बाजूने निकाल

Gram Panchayat Election Results : अजित पवार गटाने सोलापुरात खाते उघडले

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील गोंडारे, रामवाडी या दोन ठिकाणी आमदार संजय मामा शिंदे गटाचे सरपंच विजयी झाले आहेत.

कोल्हापूरातील सांगवडेवाडी सतेज पाटलांची सत्ता 

फराळे लोकनियुक्त सरपंचपद सतेज पाटील गटाकडे

Khed Gram Panchayat Elections Result 2023 : खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध

अजित पवार - 3

शिंदे गट - 1

शरद पवार - 1

भाजपा - 1

Kolhapur Gram Panchayat Elections Result LIVE Updates : हसन मुश्रीफ यांना धक्का

जठारवाडी गाव स्थानिक आघाडीच्या ताब्यात. अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफ यांना धक्का

Kolhapur Gram Panchayat Elections Result LIVE : राज्यातला पहिला सरपंच ठाकरे गटाचा

राज्यातला पहिला सरपंच ठाकरे गटाचा. कोल्हापुरातील चांदेकरवाडी लोकनियुक्त सरपंच. सौ .सीमा हिंदुराव खोत विजयी 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीचा निकाल हाती

भाजप समर्थक आघाडीचे संपूर्ण पॅनल विजयी. 11 सदस्य आणि सरपंच भाजप समर्थक आघाडीचे

Gram Panchayat Election Result | पिंपळगाव ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे

Gram Panchayat Election Result |सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पहिला निकाल

अंबा बाईची वाडी ग्रामपंचायत निकाल हाती

रामगीरी महाराज ग्रामविकास आघाडीच्या हाती गावाची सत्ता

सरपंच आणि ३ सदस्य आले निवडून

Gram Panchayat Election Result | करवीर तालुक्याची पहिली ग्रामपंचायत शिंदे गटाकडे

पहिला निकाल हाती आला आहे. करवीर तालुक्यातील धोंडेवाडी ग्राम पंचायत शिंदे गटाकडे केली आहे.

 कोल्हापुरात थोड्याच वेळात सुरु होणार मतमोजणी?

कोल्हापूर जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायती आणि अकरा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात.

बिनविरोध निकाल लागलेल्या ग्राम पंचायतींमध्ये सरस कोण ?

 भाजपा - 66

शिंदे गट - 55

ठाकरे गट - 25

काँग्रेस - 20

शरद पवार गट - 20

अजित पवार - 69

Gram Panchayat Election Updates | पुण्यात 49 सरपंचांची निवड बिनविरोध

पुण्यात सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात 

Gram Panchayat Election Updates | थोड्याच वेळात मतमोजणीस सुरुवात

6 नोव्हेंबर 2023 : राज्यात आज सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता आहे. काल ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान उत्साहात पार पडलं. आज मतमोजणीनंतर गावचा कारभारी ठरणार आहे. काही तुरळक घटना वगळता राज्यातल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान झालं. तर गावचा कारभार हाकण्यासाठी थेट जनतेतून 2 हजार 489 सरपंच निवडले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com