ज्यांचे स्वतःचे कपडे ठिकाणावर नाहीत, त्यांनी...; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर पलटवार

ज्यांचे स्वतःचे कपडे ठिकाणावर नाहीत, त्यांनी...; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर पलटवार

संजय राऊत यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : माझ्या नादी लागू नका नाही तर तुमचे सर्वांचे कपडे फाडेल, असा इशाराच संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला होता. याला जोरदार प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या कपड्यांकडे बघावं. माझ्या नादाला लागाल तर, असा टोला गुलाबराव पाटलांनी राऊतांना लगावला आहे.

ज्यांचे स्वतःचे कपडे ठिकाणावर नाहीत, त्यांनी...; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर पलटवार
तिसरा डोळा उघडला तर भस्म करेल; संतोष बांगरांचा उध्दव ठाकरेंना इशारा

गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागले आहे. संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या कपड्यांकडे बघावं. ज्यांचे स्वतःचे कपडे ठिकाणावर नाहीत त्यांनी राज्य सरकारचे कपडे बघू नये, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

यासोबतच गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी नेते गुलाबराव देवकर यांचे नाव न घेता निशाणा साधला. आधी हेच राष्ट्रवादीवाले आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणून टीका करत होते, आणि आता अजितदादा आमच्याकडे आले तर यांची बोलती बंद झाली, असेहीत्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुजरातमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी या दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. गुजरातला जाणं हा अपराध आहे का? गुजरात हे गृहमंत्र्यांचं राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे ते पॉलिटिकल बॉस आहेत, अशी टीका त्यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com