राष्ट्रवादीवाले आमच्या सोबत आले आणि खोके गायब झाले; गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी
मंगेश जोशी | जळगाव : 50 खोके म्हणून आमच्यावर खूप टीका झाली. बरं झाले राष्ट्रवादीवाले आमच्या सोबत आले आणि आमच्यावरचे खोक्याचे आरोप बंद झाले, असे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावातील दिव्यांगांच्या कार्यक्रमात भाषण करताना गुलाबराव पाटलांनी आपल्या अनोख्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यावर पण खोके म्हणून खूप टीका झाली. मात्र, बरं झाला राष्ट्रवादीवाले आमच्या सोबत आले आणि खोके गायब झाले. मात्र, कोणता कोणी नेला ते अजून पण सापडत नाहीये. तसेच, आम्ही जर दहा-पंधरा एकसारखे सरकारला लटकलो तर सरकारला पण येड करून टाकू. पण, त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. मात्र बदनामी करणारे करत राहतात. आम्ही आमचे काम करत राहतो, असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
दिव्यांग बांधवांना उद्देशून ते पुढे म्हणाले की, दिव्यांग बांधवं पाच टक्के आहेत. म्हणजेच 15000 दिव्यांग बांधव आहेत. ये गिरानेकी भी ताकद रखते है और चूनके लने की ताकद रखते है..., अशी डायलॉगबाजीही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.