राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून होणारे वक्तव्य हे एकजुटीने काम झाल्यासारखा वाटतं
मंगेश जोशी, जळगाव
शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट होत नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोठे विधान केलं आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मोदींचे विचार मांडतील असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते मात्र बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत असेल पण राष्ट्रवादीमध्ये दोन्ही गटातर्फे होणारे वक्तव्य हे एकजुटीने काम झाल्यासारखं वाटत असल्याचे मोठे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील एकजुटी बाबत जनतेमधूनच शिक्कामोर्तब झाल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.