मी तिसरा डोळा उघडला तर...; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा
जळगाव : मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगाव दाखल आले आहे. जळगाव आतील पाळधी येथे गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना थेट इशारा देत कोणतेही खातेजरी मिळाले तरी मात्र काम करण्याची धमक असली पाहिजे, असे म्हणत खाते वाटपाबाबत भाष्य केले आहे.
गुलाबराव पाटलांना मंत्री करू नका असे विरोधकांनी वरपर्यंत निरोप दिले मात्र गुलाबराव पाटलांना मंत्री करणारे हे मुंबईत होते व तक्रार करणारे जळगावात होते . मात्र मी माझं मंत्रीपद आज पर्यंत कोणाला दाखवलं नाही . माझ्या विरोधात जरी कोणी कारवाया करत असेल तरी मी त्याच्याकडे बोट दाखवलं नाही. पण मी जर माझा तिसरा डोळा उघडला तर मी काय करू शकेल हे त्यांना माहिती नसल्याची प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
'खातं खातच राहता, त्याला काय नातं राहतं'
राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लवकरच खातेवाटप होणार आहे .मला कोणते खाते मिळणार असे पत्रकारांनी विचारले पण खातं खातच राहता , त्याला काय नातं राहतं अशी प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांनी कोणतीही खाते जरी मिळाले तरी काम करण्याची धमक असली पाहिजे असल्याचे म्हंटले आहे.