Hasan Mushrif
Hasan MushrifTeam Lokshahi

तब्बल 12 तासानंतर मुश्रीफांची चौकशी संपली, नाविद मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया

ईडी अधिकाऱ्यांकडून मुश्रीफ कुटुंबियांची सकाळी सात वाजेपासून चौकशी सुरु होती.
Published by :
Sagar Pradhan

राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी आज सकाळी ईडीने छापेमारी केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ सुरु झाला. या छापेमारीनंतर मुश्रीफ यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. आता अखेर बारा तासांनंतर ईडी अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील घराबाहेर पडले आहेत. मुश्रीफ यांच्या घरी आज सकाळी सात वाजता ईडी अधिकारी दाखल झाले होते. ईडी अधिकाऱ्यांकडून मुश्रीफ कुटुंबियांची सकाळी सात वाजेपासून चौकशी सुरु होती. त्यानंतर आता ईडीकडून मुश्रीफ कुटुंबियांची चौकशी संपली आहे.

Hasan Mushrif
मला टिल्या म्हणायचं, तुला xxx म्हणू का..? नितेश राणेंची अजित पवारांवर सडकून टीका

काय म्हणाले चौकशीनंतर मुश्रीफ यांचे पुत्र?

आम्ही चौकशीला संपूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलंय. सकाळपासून जी कार्यकर्ते थांबली आहेत त्यांचे आभार मानतो. चौकशीला आम्ही उत्तर दिलेले आहे. हे तर राजकीय होते. तुम्हाला सगळे माहिती आहे. त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारले. त्याला आम्ही सक्षमपणे उत्तर दिले. सकाळी सात वाजता आले होते. साहेबांशी बोलणं झालेले नाही, अशी माहिती नाविद मुश्रीफ यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, जोपर्यंत सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही. अधिकारी त्यांचे काम करत होते. त्यांना वरुन फोन येत होते. त्या पद्धतीने ते काम करत होते. जनता त्यांना योग्यवेळी उत्तर देईल. आमच्या कार्यकर्त्यांना ते चार दिवसांपासून सांगत होते. काहीतरी होईल, असं बोलत होते. वरचे कोण आहेत ते नेमकं माहिती नाही. असे देखील नाविद मुश्रीफ यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com