राजकारण
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांना लवकर घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले होते.
आज यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.