Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे, वाचा सविस्तर
उद्धव ठाकरे हे मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जालनामध्ये माझ्या माता - भगिनींवर लाठीमार केला त्या महिलांकडून राखी बांधून घ्या - उद्धव ठाकरे
मी सरकार चालवलं आहे अभिमानाने सांगतो की अडीच वर्षाच्या कालावधीत एकही दंगल झाली नाही - उद्धव ठाकरे
आंदोलनाला बसले आहेत त्यांच्याशी बोलायला वेळ नाही तर काय चाटायचं तुमचं सरकार - उद्धव ठाकरे
विश्वगुरूंना आव्हान आहे महाराष्ट्र व्यक्तीरिक्त कोणी कोरोना काळात फिल्ड हॉस्पिटल काढलं ते सांगा - उद्धव ठाकरे
मोदींनी लस शोधली असेल तर तुम्हांला चंद्रावर काय सूर्यावर घेऊन जातील - उद्धव ठाकरे
मुंबई गोवा महामार्गाला २०० वर्ष झाले मला माहिती नाही, कारण गडकरी म्हणाले होते २०० वर्ष याला खड्डे पडणार नाहीत, आता पडले , म्हणजे आपण २०० वर्षांचे झालो आहोत - उद्धव ठाकरे
युती तोडली नसती तर फुलचे हाफ झालेले फुल म्हणून तुम्ही बसले असते - उद्धव ठाकरे
ठीक आहे तुमचे पण दिवस येतील आत जाण्याचे - उद्धव ठाकरे
हेलिकॉप्टरने शेतात जा आराम करा, आराम मंत्री असे पद निर्माण करायला पाहिजे - उद्धव ठाकरे
१ रुपयांचा विमा हा सामन्यांच्या खिशातून पैसा काढून दिला जात आहे - उद्धव ठाकरे
मराठावाड्यात १ लाख शेतकरी नैराश्याच्या गर्तेत असल्याचा अहवाल आहे - उद्धव ठाकरे
होऊन जाऊ दे चर्चा ही मन की बात नाहीत, जन की बात आहे - उद्धव ठाकरे
ज्या गोष्टी देता येणार नाही, तर प्रमाणिकपणे सांगा तुम्हांला लोक स्वीकारतील - उद्धव ठाकरे
सत्तेचे गुलाम मिंधे यांना मुंबईचं प्रेम नाही - उद्धव ठाकरे
मुंबईला भिकेला लावा आणि आपल्या आधीन करा, असा डाव दिल्लीतील दोघांचा आहे - उद्धव ठाकरे
कोणीही हुकूमशहा येऊ द्या आम्ही मुंबई कोणाला घेऊ देणार आहे - उद्धव ठाकरे
मी मुख्यमंत्री होतो तेव्हा 3 वेळा नीती आयोगाचा बैठका झाल्या होत्या तेव्हा त्यांनी मला कधी मुंबईचा विकास दिल्लीद्वारे करण्याचा प्रस्ताव नव्हता दिला.
या दोघांचे थोडे दिवस राहिले आहेत, लोकांचे शाप घेऊन जाऊ नका - उद्धव ठाकरे
घर घर मोदीची सुरूवात ही स्वतःच्या घरापासून करा ही भाजप कार्यकर्त्यांना आवाहन - उद्धव ठाकरे
प्रधानमंत्री आभास योजनेचा काळ सुरु – उद्धव ठाकरे
राज्यातलं सरकार खोक्यातून जन्माला आलंय - उद्धव ठाकरे
'एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का ?' : उद्धव ठाकरे
पक्ष चोरला पण ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र करुन दाखवला