वाल्यांचे वाल्मिकी कसे झाले; हिंदू महासंघाचा फडणवीसांना सवाल

वाल्यांचे वाल्मिकी कसे झाले; हिंदू महासंघाचा फडणवीसांना सवाल

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला समर्थन देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याविरोधात पुण्यातही हिंदू महासंघाने फडणवीसांवर बॅनर्सद्वारे निशाणा साधला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

पुणे : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला समर्थन देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नऊ आमदार मंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर, पुण्यातही हिंदू महासंघानेही फडणवीसांवर बॅनर्सद्वारे निशाणा साधला आहे.

वाल्यांचे वाल्मिकी कसे झाले; हिंदू महासंघाचा फडणवीसांना सवाल
आमच्या खोट्या सह्या घेण्यात आल्या; अजित पवारांसोबतचे दोन आमदार बॅक टू पॅव्हेलियन

काय लिहिलयं बॅनरवर?

पुण्यात हिंदू महासंघाने बॅनर्स झळकले आहेत. या बॅनरवर क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, असे फडणवीसांना विचारले आहे. तसेच, छगन भुजबळ यांच्या शेजारच्या खोलीत अजित दादा यांना अटक करुन ठेवू, असं सांगितलं होते. आणि दोघांना तुम्ही तुमच्या शेजारच्या खुर्च्या दिल्या. वाल्यांचे वाल्मिकी कसे झाले, असा सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला आहे.

भ्रष्ट्राचारी, जातीय, पारंपारिक हिंदू, विरोधक आता निष्पाप, निष्कलंक कसे झाले? हिंदुत्ववादी कसे झाले? बदलंल कोण पक्ष का नेते? सन्मानीय देवेंद्र जी आम्हाला हे नाही पटणारं, असेही बॅनरवर लिहीले आहे. या बॅनरवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांचाही फोटो आहे. यामुळे अजित पवारांसोबतची हातमिळवणी देवेंद्र फडणवीसांना महागात पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आज वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडणार आहेत. यानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. तर, आमदारांच्या दाव्यावरुन शरद पवार आणि अजित पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com