शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितलं 'तो' किस्सा
राज्याच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या शिवसेनेतील बंडखोरीची चर्चा आजही कायम चालू आहे. नेमकी हे बंडखोरी कशी झाली? का झाली? याबाबत अनेक गोष्टी समोर येत असतात. त्यातच आता जळगावमध्ये एका सभेत बोलताना भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी एक किस्सा सांगितला आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
या सर्व गोष्टी जमून आल्या घडून आल्या. यासाठी चांमुंडा मातेचा आशीर्वाद आमच्यापाठी होता. हे सोप्प नव्हतं. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते. 40 लोकं उद्धवजींना कंटाळून बाहेर पडताहेत हे सोपं नव्हतं. ऑपरेशन फेल झालं तर कसं व्हायचं? बरोबर आहे ना? 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं. 17-18 लोकं घेऊन निघायचं आणि 40 पर्यंत मजल गाठायची. 50 पर्यंत गेलो. पण हे सोप नव्हते. पुढारी कसे असतात तुम्हाला माहीत आहे. पण सर्व एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत राहीले. असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, आम्हालाही विश्वास बसला नव्हता. अचानक ऑपरेशनला तर सुरुवात झाली होती. पण एकनाथराव निघाले. ते पुढे गेले. त्यांच्यामागे काही लोक गेले आणि बघता बघता सगळं सैन्य त्यांच्या मागे गेलं. झालं एकदाचं. बुडाला लागलो तर समुद्राची लाट येते आणि ढकलून देते. अशीच लाट आली. ही लाट साधीसुधी नव्हती. तर लाट आली अन् थेट शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच बसवून दिलं. ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. असे गिरीश महाजन बोलताना म्हणाले.