राजकारण
शरद पवार यांच्याशी माझा आजही फोनवर संपर्क; अजित पवार गटाच्या 'या' नेत्याने सांगितले
अजित पवार आणि इतर नेत्यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला.
अजित पवार आणि इतर नेत्यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला. राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात.
यातच आता अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. प्रफुल पटेल म्हणाले की, मागील वेळी अमरावतीला शरद पवार यांच्यासोबत आलो होतो. आज अजित पवारांसोबत आलो आहे.
आमचा पक्ष बळकट करण्यासाठी मी येथे आलो आहे. शरद पवार साहेब यांच्याबद्दल असलेला आदर आजही माझ्या मनामध्ये कायम आहे. 'शरद पवार यांच्याशी माझे आजही बोलणं होतं. मी त्यांच्या संपर्कात आहे. असे प्रफुल पटेल म्हणाले.