2024 ला कल्याणमधील उमेदवार मीच; भाजपच्या मंत्र्यासमोर श्रीकांत शिंदेंचे विधान

2024 ला कल्याणमधील उमेदवार मीच; भाजपच्या मंत्र्यासमोर श्रीकांत शिंदेंचे विधान

आगामी निवडणुकाविषयी श्रीकांत शिंदेंचे भाष्य
Published on

अमझद खान | मुंबई : राज्यामध्ये सत्तांतर होऊन शिंदे गट आणि भाजपचं सरकार स्थापन झालं. या सत्तास्थापनेनंतर आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत तो लोकसभा मतदारसंघ भाजपने मागितला असल्याचं बोललं जात आहे. अशात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमोरच श्रीकांत शिंदे यांनी मीच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आजपासून तीन दिवस कल्याण लोकसभा दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकूर यांचे स्वागत श्रीकांत शिंदे यांनी केले. श्रीकांत शिंदे म्हणाले, राज्यात हे सरकार आल्यानंतर लोकांमध्ये उत्साह चैतन्याचा वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यात रेकॉर्ड तोड निर्णय घेण्यात आले आहेत. साठ दिवसात हे झाले, असे त्यांनी म्हंटले आहे.

अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करतात. त्यामुळे आता काय होणार याबाबत अनेक जणांनी प्रश्न विचारले. मात्र, याबाबत अमित शहा यांनी दौऱ्यादरम्यान येत्या काळात प्रत्येक निवडणूक ही खरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे युतीमध्ये लढवण्यात येईल. तर, कल्याणमध्ये 2024ला मीच उमेदवार असे स्पष्ट केल्याचे सांगितले.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीबाबत सुरू असलेल्या चर्चेची मला माहिती नाही, परंतु, आगामी काळातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र युती म्हणून लढू. शिवसेना-भाजप युती असेल असं स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं असल्यामुळे आम्ही सगळ्या निवडणुका युतीतच लढणार, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com