Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

मला "देवेंद्र शेट्टी फडणवीस" होयला आवडेल, उपमुख्यमंत्र्यांचे विधान

जशी दुधात साखर विरघळते तसेच बंट समाज मिसळतो आणि गोडवा सुद्धा वाढवतो

मुंबई : मला असं वाटतंय माझं माव देवेंद्र शेट्टी फडणवीस आहे. जर माझं नाव शेट्टी झालं तर दोन-चार हॉटेल माझ्या नावावर असतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. ते आज एका कार्यक्रमात बोलत होते.

Devendra Fadnavis
रामदास कदम शरीराने शिंदेंजवळ मात्र, मनाने ठाकरेंजवळच?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोपाळ शेट्टी यांनी भरघोस मत मिळतात. कारण सर्वांनाच असं वाटतं की कुठल्याही अडचणीत ते गोपाळ शेट्टी यांच्याकडे जाऊ शकतात. बंट समाजाचे सामाजिक संघटनेत योगदान आहे. कुटुंबासाठी तर आपण जगतोच. पण, आपल्या समाजासाठी, देशासाठी सुद्धा जगणे महत्वाचे आहे आणि हेच बंतारा समाजाच्या माध्यमातुन होत आहे. तुमची प्रगती म्हणजे राज्याची व देशाची प्रगती आहे. असंच मला बोलवत राहा दुसऱ्यांना सुद्धा बोलवा पण मला देखील बोलवा, असे त्यांनी म्हंटले आहे.

असं कोणतच क्षेत्र नाही जिथे बंतारा समाजाचे योगदान नाही. जशी दुधात साखर विरघळते तसेच बंट समाज मिसळतो आणि गोडवा सुद्धा वाढवतो. मी अनेक वेळा या कार्यक्रमात आलो, त्यामुळे कार्यक्रमात माझा उल्लेख देवेंद्र फडणवीस शेट्टी असा केला गेला. आता माझा उल्लेख शेट्टी केला, त्यामुळे दोन-चार हॉटेल तरी माझ्या नावावर होतील, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Devendra Fadnavis
‘त्या’ निकषाने शिवसेनेलाच मिळणार शिवतीर्थावर परवानगी? सावंतांचा दावा

गोपाळ शेट्टी यांच्यासारखे व्यक्ती राजकारणात देखील यशस्वी झाले आहेत. बंट समाजाचे अतिशय कमी वोटर असतानाही गोपाळ शेट्टी निवडून येतात. समाजाचे मागे आहेत. त्यांना हात देऊन पुढे करण्याचे काम बंट समाजाच्या वतीने होत आहे. समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा सरकारने मी तुमच्यासोबत आहे. तुमचे जेव्हा प्रगती होते तेव्हा आपल्या राज्याची आणि देशाची ही प्रगती होते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com