Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदी आणि शहांचा हस्तक असल्याचा मला सार्थ अभिमान, ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचे विचार पुढे नेले
Published by :
Sagar Pradhan

मुंबईत आज शिवसेना आणि शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली गेली होती. यावेळी दोन्ही मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थितीत होत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. तेव्हा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी अनेक विषयावर पडदा टाकला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणात उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करत टीकास्त्र डागले.

Eknath Shinde
...तर मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन : उध्दव ठाकरे

हे आहेत मुख्यमंत्री यांच्या भाषणातील दहा मुद्दे

खरी शिवसेना कोण आहे आता हा प्रश्न आता पडणार नाही

आमच्या भूमिकेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. माध्यमांना सांगतो कॅमेरा वळून महाराष्ट्राच्या जनतेला हा अफाट जनसागर दाखवा. तुम्हाला आता कळल असेल खरी शिवसेना कोण आहे.हा प्रश्न आता पडणार नाही.

तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली- मुख्यमंत्री शिंदे

तुम्ही बाळासाहेबांच्या विचारणा तिलांजली दिली. स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचा विचार गहाण टाकला. तुम्ही तुमचा इमान सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या हातात दिली. आम्ही ही भूमिका महाराष्ट्राच्या हितासाठी घेतली आहे. ते ही जाहीर भूमिका घेतली.

आम्ही गद्दार नाही तुम्ही खरे गद्दार

शिवसेना ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेंची ही शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. होय गद्दारी झाली? तुम्ही ज्या दिवशी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत युती केली तेव्हाच गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली आहे.

ही भूमिका घेताना वेदना झाल्या- मुख्यमंत्री शिंदे

आम्ही जो उठाव केला तो घेताना आम्हाला आनंद झाला नाही. निर्णय घेताना आम्हाला वेदना झाल्या. आम्ही जो निर्णय घेतला तेव्हा वाईट वाटल. मात्र अडीच वर्ष खदखद होती, त्याच गोष्टीचा तीन महिन्यांपूर्वी उद्रेक झाला.

पीफआय आणि संघाची तुलना करताना लाज वाटली पाहिजे

केंद्र सरकारने पीआयफवर बंदी घातली त्यानंतर राष्ट्रीय स्वयम संघावर बंदीची मागणी येऊ लागली. ही मागणी कोणी केली तुम्हाला माहित आहे. पीफआय आणि संघाची तुलना करताना लाज वाटली पाहिजे.

संजय राऊत यांना टोला

आम्हाला रिक्षावाला टपरीवाला म्हणणारे आता कुठे? आमच्या विरुद्ध बोलणाऱ्याच काय होत माहित आहे ना? मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना टोला

मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला भुरळ घातली, जगभर देशाचे नाव करता त्यांची टिंगल करता, गृहमंत्र्यांची टिंगल करता. ज्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्न पूर्ण करणाऱ्याची तुम्ही टिंगल करता आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

पवारांनी काय सांगितले ते ही योग्य वेळ आली की जाहीर करेल

मुख्यमंत्री पदाबाबत काय ठरलं होत आता ते सांगणार नाही. माझ्यात तुमच्यात काय ठरल होत ते आता जाहीर करणार नाही? योग्य वेळ आली की जाहीर करेल. पवारांनी काय सांगितले ते ही योग्य वेळ आली की जाहीर करेल. असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.

दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदी आणि शहांचा हस्तक असल्याचा मला सार्थ अभिमान

मला नेहमी मोदी आणि शहांचा हस्तक म्हणून हिणवल जात, मात्र दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदी आणि शहांचा हस्तक असल्याचा मला सार्थ अभिमान, ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचे विचार पुढे नेले. असे विधान शिंदेंनी बोलताना केली आहे.

कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारख्या दुटप्पी राजकारणी नव्हता

मला कटप्पा म्हणतात, पण त्यांना हे माहित नाही कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्या सारख्या दुटप्पी राजकारणी नव्हता. अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

तुम्ही प्रॉपर्टीचे वारसदार, आम्ही विचारांचे वारसदार

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारंवार उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उत्तर दिले आहे. त्यावेळी बाळासाहेबांच्या तुम्ही प्रॉपर्टीचे वारसदार, आम्ही विचारांचे वारसदार असे विधान करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

हे भाड्यानी आणलेले लोक नाहीत, मनाने आलेले लोक आहेत

विरोधक आणि शिवसेना नेत्यांकडून शिंदे गटाच्या मेळाव्यावर जोरदार टीका केली जात होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्यात उत्तर दिले आणि ही लोक भाड्यानी आणलेले लोक नाहीत, मनाने आलेले लोक आहेत. असे उत्तर दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com