Imtiaz Jaleel Pankaja Munde
Imtiaz Jaleel Pankaja MundeTeam Lokshahi

पंकजाताई भाजपमधून बाहेर पडा अन् MIMला सोबत घ्या; जलील यांची खुली ऑफर

भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत.

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमापासून पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याचे समजत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना मोठी ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आता भाजपातून बाहेर पडावं, एमआयएमला सोबत घ्यावं, असे त्यांनी म्हंटले आहे.

Imtiaz Jaleel Pankaja Munde
राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती, एमएसईबी संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यात जे.पी. नड्डा यांच्या औरंगाबादेतील कार्यक्रमाच्या पत्रिकेवरवरून पंकजा मुंडे यांचा फोटो नव्हता. तसेच, पंकजा मुंडे यांना भाषण करण्यासही केवळ दोन मिनिटे दिली होती. यावर नाराज झालेल्या पंकजा यांनी एका मिनिटात आपले भाषण संपवले. यावरुन राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अशातच इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना खुली ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडा, आणि आम्हाला सोबत घ्या. आपण एकत्र आल्यास महाराष्ट्रात मोठा बदल दिसेल. याद्वारे ओबीसी आणि मुस्लिम समाज एकत्र येऊ शकतो, असे जलील यांनी म्हंटले आहे.

Imtiaz Jaleel Pankaja Munde
केसरकरांनी 2024 मध्ये तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी- संजय राऊत

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नाराजीच्या चर्चा फेटाळल्या होत्या. त्या म्हणाल्या की, पक्षाचे आदेश मानणं हे माझ्यावरचे संस्कार आहेत. तसेच निमंत्रण पत्रिकेत माझं नाव असण्याचं काही कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, म्हणून मी नाराज आहे म्हणणं चुकीचं आहे. मला भाषणासाठी कमी वेळ दिला हे म्हणणंही चुकीचं आहे, कारण वेळ कमी होता आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं भाषण महत्वाचं होतं, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com