Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi

केसरकरांनी 2024 मध्ये तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी- संजय राऊत

दीपक केसरकर यांनी २०२४ पर्यंत संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार असं विधान केले होते.

दीपक केसरकर यांनी २०२४ पर्यंत संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार असं विधान केले होते. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिपक केसरकरांना प्रतिउत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की, आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जाऊ, आम्ही जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत, आम्ही तुमच्यासारखे पळकुटे नाहीत. आम्ही तुमच्यासारखे लफंगेपण नाहीत. केसरकर म्हणजे न्यायालयात नाहीत, आणि ते कायदा नाही. दीपक केसरकर जर खरंच असं बोलले असतील तर २०२४ साली त्यांनीही तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी. असे म्हणत राऊतांनी केसरकरांवर हल्लाबोल केला आहे.

तसेच मुंबई बिझनेस सेंटर आहे. जर कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत येत असतील आणि आपल्या राज्याच्या विकासाठी चर्चा करण्यासाठी मुंबईत निवडत असतील तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, यापूर्वीही योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये फिल्मसिटी काढण्याची घोषणा केली होती. पण योगी आदित्यनाथ यांनी गुजरातमध्ये सुद्धा गेलं पाहिजे, असे ते म्हणाले.

यासोबत प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे संघटन हे जर शिवसेनेसोबत आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरु होईल. असे खासदार संजय राऊत म्हणाले. कुणाचा विरोध आहे, कुणाचा नाही हे भविष्यात कळेल, पण विरोध आहे असं वाटत नाही. महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांना माननारी शक्ती प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली एकवटली आहे, त्याला महाराष्ट्रात मुख्य राजकीय प्रवाहात विरोध आहे, पण प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे संघटन हे जर शिवसेनेसोबत आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरु होईल. शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र यावी ही शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) इच्छा होती. शिवशक्ती- भीमशक्ती महाराष्ट्राची ताकद आहे. असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com