औरंगजेबासोबत आमचा काही संबंध नाही, कबर हलवायची असेल तर... : इम्तियाज जलील

औरंगजेबासोबत आमचा काही संबंध नाही, कबर हलवायची असेल तर... : इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद हा आता वाद पेटला आहे.

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद हा आता वाद पेटला आहे. शहराचं नाव औरंगाबाद असावं या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच आंदोलन सुरू असताना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि प्रदीप जयस्वाल यांनी औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी केली आहे. यावर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगजेबासोबत आमचा काही संबंध नाही, कबर हलवायची असेल तर... : इम्तियाज जलील
2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा; संजय राऊतांचा लोकशाहीवर गौप्यस्फोट

आम्हाला औरंगजेबासोबत काही घेणं देणं नाही त्याचा आमचा काही संबंध नाही जसं शहराचा नामांतर आमच्यावर लादलं तसा औरंगजेब आमच्यावर का लादता, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. औरंगजेबाची कबर जिथे हलवायची तिथं हलवा आम्हाला विचारताय की सांगताय हे कळायला मार्ग नाही, असं जलील यांनी म्हंटले आहे.

जर आमची परवानगी हवी असेल तर त्याचा एक पत्र घेऊन या बघू आम्ही परवानगी द्यायची की नाही, असा टोलाही जलील यांनी लावला. तर आमचं उपोषण नाही तर साखळी आंदोलन आहे. त्यामुळे तिथं रोजच जेवण होणार कदाचित माझं पहिल्या दिवशी मराठी चुकलं असेल आणि म्हणून मी उपोषण म्हणालो असेल, असा यू टर्न इम्तियाज जलील यांनी घेतला.

या शहरात कायदा व्यवस्था बिघडवण्याला आम्ही जबाबदार नाही आमचा काही संबंध नाही तुम्ही नामांतर आमच्या शहरावर लादता आणि उलट आम्हाला शहराचा वातावरण बिघडवता असं म्हणता हे योग्य नाही. आमचा आंदोलन शांतता प्रिय मार्गाने आहे, ते राहील सगळ्यांनी शांतीने आंदोलन करावं कायदा व सुव्यवस्थेची काळजी सगळ्यांनी घ्यावी. तर जो कोणी शांतीने आंदोलन करेल त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा असेल, असेही जलील म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली. एकीकडे नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे आता या निर्णयाचा विरोध होताना देखील दिसत आहे. या नामांतराविरुद्ध खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. मात्र, त्यावेळी या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com