पुण्यात भाजप आमदारच्या मतदार संघातच निर्मला सीतारामन यांच्या फ्लेक्सला फासले काळे

पुण्यात भाजप आमदारच्या मतदार संघातच निर्मला सीतारामन यांच्या फ्लेक्सला फासले काळे

भाजपाच्याच नेत्याचा काळे फासून अपमान केल्याने परिसरातील राजकीय वातावरण तापलं

चंद्रशेखर भांगे | पुणे : केंद्रीय अरेथमंत्री निर्मला सीतारामन या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत. अशातच पुण्यातील खडकवासला येथे सीतारामन यांच्या स्वागतपर लावण्यात आलेल्या कमानीवर काळे फासले. खडकवासल्याचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या मतदार संघात ही घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

बारामती मतदासंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी व भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मिशन बारामतीची भाजपाने जबाबदारी दिली आहे. सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथील शिवछत्रपती सभागृहात खडकवास मतदार संघाच्या वतीने आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त गुरुवारी स्वागतपर कमान लावण्यात आली होती. या फ्लेक्स कमानीवर काही समाजकंटकांनी रात्रीतून काळे फासले गेले. भाजपकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे. परंतु, याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. अथवा फिर्यादही नोंदवण्यात आली नाही.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारपासून ‘मिशन बारामती’ मोहिमेला सुरुवात केली. सासवडमध्ये बूथ अध्यक्षांची मिटींग घेतली आणि त्या लगेच बाहेर आल्या. मात्र, ज्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी ही बैठक झाली होती. त्यांच्या कुटुंबाला अर्थमंत्र्यांसोबत एक फोटो काढायचा होता. कार्यकर्त्याने त्यांना विनंती केली असता निर्मला सीतारामन भडकलेल्या पाहायला मिळाल्या. सीतारामन यांनी फोटो काढण्यावरुन कार्यकर्त्याला झापले. यामुळे कार्यकर्ते काहीसे नाराज झाल्याचे दिसत होते.

Lokshahi
www.lokshahi.com